आयुषमान खुराणाने केली अशी हॅट्रिक, वाचून तुम्हीही कराल कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:53 IST2019-07-11T16:50:27+5:302019-07-11T16:53:17+5:30

आयुषमान खुराणाने एकामागोमाग एक हीट सिनेमा दिले आहेत. बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते.

Aayushman khurana got hattrick by this way | आयुषमान खुराणाने केली अशी हॅट्रिक, वाचून तुम्हीही कराल कौतूक

आयुषमान खुराणाने केली अशी हॅट्रिक, वाचून तुम्हीही कराल कौतूक

ठळक मुद्दे आर्टिकल 15 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला

आयुषमान खुराणाने एकामागोमाग एक हीट सिनेमा दिले आहेत. बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. आयुषमानच्या नुकत्याच रिलीज झालेला आर्टिकल 15 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला. आतापर्यंत शुभ मंगल सावधान, बरेली की बर्फी, अंधाधुन, बधाई हो आणि आता आर्टिकल 15 असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमा आयुषमानने बॉलिवूडला दिले आहेत.

आर्टिकल 15 सिनेमाबाबत बोलायचे झाल तर हा सिनेमाचा आशय चांगला असेल तर सिनेमा चालतो हे आयुषमानने सिद्ध करुन दाखवलं. 
आयुषमान लवकरच 'शुभ मंगल सावधान'च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असे आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या चित्रपटाचा सीक्वल आधीच्या भागापेक्षा खूप चांगला असणार असल्याचे बोलले जात आहे. आधीच्या भागात आयुषमानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत पहायला मिळाली होती.


'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची कथा समलैंगिक प्रेमकथेवर आधारीत असणार आहे. या चित्रपटात आयुषमान सोबत दिव्येंदू शर्माला घेण्याबाबत बोलले जात आहे. या सिनेमात आयुषमान अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अद्याप याबद्दल या अभिनेत्याकडून किंवा चित्रपटाच्या टीमकडून अधिकृतरित्या कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य करणार आहे.

Web Title: Aayushman khurana got hattrick by this way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.