'अंतिम' सिनेमातील आयुष शर्माचा नवा लूक आला समोर, सलमान खानला देणार टक्कर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 15:57 IST2021-02-03T15:54:37+5:302021-02-03T15:57:04+5:30
सेटमधील आयुष शर्माने स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे.

'अंतिम' सिनेमातील आयुष शर्माचा नवा लूक आला समोर, सलमान खानला देणार टक्कर ?
आयुष शर्माचा बहुप्रतिक्षित अंतिम : द फायनल ट्रुथ'' चित्रपटाविषयी प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे, कारण सलमान खान आणि आयुष शर्मा या सिनेमात एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ असेल. चित्रपटाच्या सेटमधील आयुष शर्माने स्वत: चा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयुष शर्मा अतिशय भयंकर लूकमध्ये दिसत आहे.
आयुषने या फोटोच्या माध्यामातून त्याची भूमिका किती दमदार आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.हा फोटो शेअर करत आयुष शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले आहे , “Rahuliya #antimthefinaltruth." या सिनेमात आयुषचे नाव राहुल असेल हे यावरून ,स्पष्ट होते.
सलमान यात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयष गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अंतिम - द फायनल ट्रुथ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेय तर सिनेमा सलमान खान प्रॉडक्शनखाली तयार होत आहे. यात आयुष शर्माच्या अपोझिट महिमा मकवाना बॉलिवूड डेब्यू करणार आहे. याशिवाय सलमानच्या अपोझिट प्रज्ञा जैसवाल झळकणार आहे. प्रज्ञा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.हा सिनेमा पुढील वर्षी २०२१ मध्ये रिलीज होणार आहे.