Anu Aggarwal : एका अपघाताने सगळं बदललं...! ‘आशिकी’ फेम अनु अग्रवालचे ताजे फोटो पाहून बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 03:18 PM2022-09-01T15:18:47+5:302022-09-01T16:02:34+5:30

Anu Aggarwal Transformation : काळाच्या ओघात अनु व राहुल बॉलिवूडपासून दुरावले. राहुल एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांमुळे बॉलिवूडमधून दूर फेकला गेला तर अनुला नियतीने बॉलिवूडमधून जाण्यास भाग पाडलं...

aashiqui fame anu aggarwal lastest pics shocked you | Anu Aggarwal : एका अपघाताने सगळं बदललं...! ‘आशिकी’ फेम अनु अग्रवालचे ताजे फोटो पाहून बसेल धक्का!!

Anu Aggarwal : एका अपघाताने सगळं बदललं...! ‘आशिकी’ फेम अनु अग्रवालचे ताजे फोटो पाहून बसेल धक्का!!

googlenewsNext

Anu Aggarwal Transformation in real life: 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ (Aashiqui) या सिनेमानं लोकांना अक्षरश: वेड लावलं होतं. यातली गाणीही तुफान गाजली होती. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल (Anu Aggarwal) या जोडीनेही लोकांच्या मनात घर केलं होतं. आजही या जोडीला लोक विसरू शकलेले नाहीत, हेच या चित्रपटाचं यश आहे. काळाच्या ओघात अनु व राहुल बॉलिवूडपासून दुरावले. राहुल एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांमुळे बॉलिवूडमधून दूर फेकला गेला तर अनुला नियतीने बॉलिवूडमधून जाण्यास भाग पाडलं.

होय, ‘आशिकी’ने तिला एका रात्रीत स्टार केलं आणि नियतीने एकाच रात्रीत तिला बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर फेकलं. एका अपघाताने तिचं अख्खं आयुष्य बदललं. 
 सध्याचे अनुचे फोटो पाहाल तर विश्वास बसणार नाही, इतकी ती बदलली आहे. अनुने तिचा ताजा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

अपघात झाला आणि सगळं बदललं...
‘आशिकी’नंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते.  करियर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच 1999 मध्ये तिच्या गाडीला अपघात झाला.  1999 मध्ये एका रात्री पार्टीहून घरी परतत असताना अनुच्या गाडीला भीषण अपघात झाला. एका कारने तिच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अनु रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. भर रस्त्यात झालेल्या या अपघातानंतरही अनुला कोणी ओळखूही शकले नव्हते.
कुणीतरी पोलिसांना कॉल केला आणि  पोलिसांनी जखमी अवस्थेतील अनुला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं.. या अपघातानंतर अनु जवळपास 29 दिवस कोमात गेली. इतकेच नाही तर तिची स्मरणशक्तीही गेली.

सुदैवाने ती कोमातून बाहेर आली पण तोपर्यंत आयुष्य बदललं होतं. भूतकाळातील काहीही अनुला आठवेना. पुढे  स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी अनु बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी तिने कठीण योगसाधना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर आली खरी. पण तोपर्यंत बराच काळ लोटला होता. या काळात बॉलिवूडमधील लोकांनाही तिचा विसर पडला होता.

सध्या काय करते अनु?
आजारपणातून बाहेर आल्यानंतर तिने तिची सगळी संपत्ती दान केली आणि संन्यास घेतला.  2015 मध्ये "Anusual- Memoir of a Girl who Came Back from the Dead" हे स्वत:च्या आयुष्यावरचे पुस्तक तिने लिहिलं.  हे पुस्तक प्रचंड गाजलं होतं. अनु सध्या बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर बिहारमध्ये राहाते. तिथे ती योगा शिकवते. गेल्या काही वर्षांत अनुमध्ये इतका बदल झाला आहे की तिला आता ओळखणं देखील कठीण झालं आहे. 

Web Title: aashiqui fame anu aggarwal lastest pics shocked you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.