सोनम कपूरच्या घरी शिफ्ट होणार आनंद अहुजा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 14:45 IST2018-07-06T14:34:10+5:302018-07-06T14:45:06+5:30
यावर्षीच सर्वाधिक चर्चेत राहिलेले लग्न म्हणजे सोनम कपूरचे. सध्या सोनम पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये आहे

सोनम कपूरच्या घरी शिफ्ट होणार आनंद अहुजा ?
यावर्षीच सर्वाधिक चर्चेत राहिलेले लग्न म्हणजे सोनम कपूरचे. सध्या सोनम पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये आहे. मात्र आता अशी बातमी कानावर येतेय की सोनम आणि आनंद मुंबईतल्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट व्हायचा प्लॉन करतायेत. मीडिया रिपोर्टनुसार सोनमने 2015 साली 35 कोटी रुपयांना हे घर खरीदी केले होते. याच घरात सोनमचा मेहंदी सेरेमनी झाली होती. सोनमने या प्रॉपर्टीमध्ये खूप आधीच पैसे गुंतवले होते. त्यांनी प्लॉन केला होता ज्यावेळी दोघे मुंबईच असतील तेव्हा या ठिकाणी रहातील. सोनमची इच्छा होती वांद्रात तिचा मॅरिटल होम असावा. तिने घराला सजवणे सुद्धा सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या तिच्या लंडन ट्रीप दरम्यान तिने घरातल्या डेकॉरेशनचे काही सामान सुद्धा खरेदी केले आहे.
रिपोर्टनुसार या वर्षाच्या शेवटी ते दोघे मुंबईतल्या घरी शिफ्ट होणार आहेत. हे कपल मुंबई, दिल्ली आणि लंडनमध्ये या तिनही ठिकाणी राहणार आहे. दिल्ली आणि मुंबईत त्यांचे कुटुंबीय राहतात तर लंडनमध्ये आनंदच्या बिझनेसनिमित्त ते राहातील. वोग मॅगझीनला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान सोनमने सांगितले होते की, तिची आणि आनंदची ओळख झाली, मग दोघांमधला संवाद कसा वाढला. आपल्या पहिल्या डेट दरम्यानच्या आठवणीं ही सोनम शेअर केल्या होत्या.
सोनम लवकरच आपल्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमाच्या रिमेकमध्ये ती दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनमने या चित्रपटाचा टीजर शेअर केला होता. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सोनम आपल्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.