आमिर-सलमानमध्ये 'दरार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:49 IST2016-01-16T01:19:07+5:302016-02-09T10:49:03+5:30

आमिर-सलमानमध्ये 'दरार' 'अं दाज अपना अपना' पासून सुरू झालेल्या आमिर आणि सलमानच्या दोस्तीला ग्रहण लागले आहे. त्याचे झाले असे ...

Aamir-Salman 'crack' | आमिर-सलमानमध्ये 'दरार'

आमिर-सलमानमध्ये 'दरार'

िर-सलमानमध्ये 'दरार'
'अं दाज अपना अपना' पासून सुरू झालेल्या आमिर आणि सलमानच्या दोस्तीला ग्रहण लागले आहे. त्याचे झाले असे की, आमिरने त्याच्या घरी नुकतीच एक पार्टी ठेवली होती. पार्टीत सलमानसह बॉलीवुडचे अनेक सितारे हजर होते. यावेळी सलमानच्या 'बजरंगी भाईजान' ची आमिरने खुप तारिफ केली. इथपर्यंत सगळे ठीक चालले होते. मात्र नंतर आमिर सलमानच्या चित्रपटांची टिंगल करू लागला. 'सलमानने ही परिपक्वता जर करियरच्या सुरूवातीला दाखवली असती तर गर्व वाटावा अश्या चित्रपटांची मोठी यादी त्याच्याकडे असली असती. चित्रपटाची कथा, हार्डवर्क यांच्याशी सलमानचे काहीही देणेघेणे नसते.' अशा शब्दांत आमिरने सलमानची मजा घ्यायला सुरूवात केली. यावर सलमान चिडला आणि म्हणाला ' तुझ्याइतका मेहनती नसलो, तरी यशाचे क्रेडीट लेखक, दिग्दर्शकाला द्यायला मी विसरत नाही.' पार्टीतून जाताना सलमान आमिरला 'फेक' म्हणाला. यानंतर आमिरच्या डोळ्यात आलेले पाणी उपस्थितांनी पाहिले. आता हे भांडण कुठल्या टोकाला जाणार, हे येणारा क ाळच ठरवेल.'

Web Title: Aamir-Salman 'crack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.