कॅटरिना कैफच्या आधी कंगना राणौवतला आली होती आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 16:44 IST2017-09-14T11:11:53+5:302017-09-14T16:44:10+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून कंगना राणौत त्याच्या इंटरव्ह्युमुळे चर्चेत आली आहे. कंगनाचे म्हणण्यानुसार तिच चित्रपटाची खरी हिरो असते. एक इंटरव्ह्यु ...

कॅटरिना कैफच्या आधी कंगना राणौवतला आली होती आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ची ऑफर
ग ल्या अनेक दिवसांपासून कंगना राणौत त्याच्या इंटरव्ह्युमुळे चर्चेत आली आहे. कंगनाचे म्हणण्यानुसार तिच चित्रपटाची खरी हिरो असते. एक इंटरव्ह्यु दरम्यान देखील ती असे म्हणाली होती की मी चित्रपटात दुसऱ्या भूमिका नाही साकारणार. मग त्या चित्रपटाची ऑफर मला खानकडून आली असली तरी. एका रिपोर्टनुसार कंगनाने 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' चित्रपट अशाच कारणमुळे नाकारला. या चित्रपटासाठी आदित्य चोप्राने तिला विचारले असता तिने साफ नकार दिला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आमिर खान एकत्र पहिल्यांदाच दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता जी भूमिका चित्रपटात कॅटरिना कैफ साकारते आहे त्या भूमिकेसाठी आधी कंगनाची निवड करण्यात आली होती. पण क्वीन फेम कंगनाला अमीर आणि अमिताभ पुढे आपल्यालाला काहीच वजन मिळणार नाही असे तिला वाटले असेल म्हणून तिने बहुतेक हा चित्रपट नाकारला. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी ही कंगनाने सलमान खानच्या सुल्तान या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. अनुष्का शर्माच्या आधी कंगनाला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते पण तिचे असे म्हणणे होते की माझ्या अटी ते पूर्ण करू शकत नव्हते. अर्थातच सुल्तान ब्लॉकबास्टर ठरला. सध्या कंगनाचा हंसल मेहता दिग्दर्शित "सिमरन" १५ सप्टेंबरला रिलिज होणार आहे.
ALSO READ : कंगना राणौतने नेपोटिझमवर बोलू नये; कारण ती सुद्धा नेपोटिझमचेच प्रॉडक्ट आहे!!
कंगनाने नुकत्याच दिलेल्या एक इंटरव्ह्यु दरम्यान म्हटले की, काही अभिनेत्रींचे म्हणने आहे की हिरोमध्ये प्रेक्षकांना थेटरपर्यंत खेचून आणण्याची क्षमता असते जर असे आहे तर मग तुम्ही कसले पैसे मागता, मला विचारलं तर माझे वैयक्तिक मत असे आहे की आम्ही वर्षभर तेवढीच मेहनत घेतो जेवढी आहे हिरो घेतो मग हा भेदभाव का? ती पुढे म्हणाली की इंडस्ट्री फक्त चार हिरो आणि चार हिरोइन्सच नाही आहे की जे ते म्हणतील तसेच होईल, मी ह्या क्षेत्रात नवीन आहे मला मान्य आहे पण गेल्या १०वर्षात मी फार काही कमावले आहे.