याला म्हणतात नशीब! पहिल्या सिनेमाच्या रिलीजआधी आमिरचा लेकाला दुसऱ्या सिनेमाची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:07 IST2023-03-24T13:06:06+5:302023-03-24T13:07:54+5:30
Aamir Khan’s Son Junaid : सध्या आमिर मोठ्या ब्रेकवर गेलाये. पण हो, आमिरचा मुलगा जुनैद खानची गाडी मात्र सूसाट पळतेय...

याला म्हणतात नशीब! पहिल्या सिनेमाच्या रिलीजआधी आमिरचा लेकाला दुसऱ्या सिनेमाची ऑफर
Aamir Khan’s Son Junaid : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अलीकडे आलेला त्याचा लाल सिंग चड्ढा हा सिनेमा सुपरडुपर फ्लॉप झाला. सध्या आमिर मोठ्या ब्रेकवर गेलाये. पण हो, आमिरचा मुलगा जुनैद खानची गाडी मात्र सूसाट पळतेय. आमिरचा मुलगा जुनैद खानने यशराज बॅनरच्या महाराजा या सिनेमातून ब्रेक मिळालाये. त्याचा हा डेब्यू सिनेमा रिलीज झालेला नसताना आता जुनैदला आणखी एका मोठ्या सिनेमाची ऑफर आली आहे. होय, एका सुपरहिट साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी जुनैद खानला साईन केल्याची चर्चा जोरात आहेत.
तमिळ हिट चित्रपट ‘लव्ह टुडे’च्या हिंदी रिमेकमध्ये जुनैद लीड भूमिकेत दिसू शकतो, असं मानलं जातंय. अर्थात अद्याप याबाबत जुनैदने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जुनैदने या सिनेमासाठी होकार दिल्याची माहिती आहे.
‘लव्ह टुडे’ हा चित्रपट गेल्या वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. फक्त ५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत सुमारे १५० कोटींचा गल्ला जमवला होता. या तमिळ चित्रपटात प्रदीप रंगनाथन आणि इवाना मुख्य भूमिकेत होते.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जुनैदने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच यशराज बॅनरच्या महाराजा या सिनेमात त्याची वर्णी लागली. या
सिनेमात तो पत्रकाराची भूमिका साकारतो आहे. सिनेमा प्रर्दशनासाठी तयार आहे. आमिर खान प्रॉडक्शनच्या प्रीतम प्यारे या वेब सीरिजमध्येही तो आहे. जुनैदने अमेरिकन ॲकेडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स, लॉस एंजेलिसमधून शिक्षण घेतलं आहे. आता जुनैद वडिलांसारख नाव मोठं करायचं आहे. या प्रयत्नात तो किती यशस्वी होतो ते बघूच.