आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ व ‘तारे जमीन पर’चे आहे एक स्पेशल कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:51 IST2017-10-16T08:21:35+5:302017-10-16T13:51:35+5:30

आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतो आहे. तुम्ही सगळेच हा चित्रपट पाहण्यास आमच्याइतकेच उत्सूक आहात, ...

Aamir Khan's 'Secret Superstar' and 'Stars Land Par' is a special connection! | आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ व ‘तारे जमीन पर’चे आहे एक स्पेशल कनेक्शन!

आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ व ‘तारे जमीन पर’चे आहे एक स्पेशल कनेक्शन!

िर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतो आहे. तुम्ही सगळेच हा चित्रपट पाहण्यास आमच्याइतकेच उत्सूक आहात, हे आम्ही जाणून आहोत. याच उत्सुकतेतून आम्ही तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग माहिती घेऊन आलो आहोत. होय,  आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’चे त्याच्याच एका चित्रपटाशी खास कनेक्शन आहे. हा चित्रपट कोणता तर ‘तारे जमीन पर’. होय,  ‘सीक्रेट सुपरस्टार’चे ‘तारे जमीन पर’सोबत एक स्पेशल कनेक्शन आहे. आता हे स्पेशल कनेक्शन काय, हे तुम्हाला कळायलाच हवे. तर पुढे वाचा...
‘तारे जमीन पर’मध्ये बाल कलाकार दर्शील सफारीने लीड भूमिका साकारली होती. अख्खा चित्रपट दर्शीलच्या अवती-भवती फिरताना दिसला होता. दर्शील अभ्यासात कच्चा आहे. पण  चित्रकलेत मात्र तो अव्वल आहे. वडिलांच्या दबावामुळे दर्शील आपले बालपण हरवू लागला असतानाच शिक्षकाच्या भूमिकेतील आमिर खान त्याच्या आयुष्यात येतो आणि दर्शीलला योग्य दिशा दाखवतो.
‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातही आमिर काहीशा अशाच भूमिकेत दिसणार आहे. होय, जायरा वसीम या चित्रपटात लीड भूमिकेत आहे. जायराला एक गायिका बनवायचे असते. पण वडिलांचा विरोध असतो. अशात आमिर तिच्या आयुष्यात येतो आणि तिला दिशा दाखवतो. चित्रपटात आमिर  एक ा म्युझिक कम्पोजरच्या भूमिकेत दिसणार आहे. जायराला तिच्या स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचवणारा म्युझिक कम्पोजर आमिरने यात साकारला आहे. एकंदर काय तर ‘सीक्रेट सुपरस्टार’ आणि ‘तारे जमीन पर’ची स्टोरीलाईन  एकमेकांशी मिळती जुळती आहे. अर्थात सेम टू सेम नाही तर काहीअर्थाने. आता एवढे सगळे ऐकल्यानंतर आमिरचा हा चित्रपट पाहण्याची तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असणार, हे आम्ही जाणतोच.

ALSO READ : OMG!! ​आंघोळ टाळण्यासाठी नवनवे बहाणे बनवतो आमिर खान, जिममध्ये देतो शिव्या

आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसखाली तयार होणाºया  ‘सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमात आमिरने शक्ती कुमार नावाची   भूमिका साकारली आहे. या सिनेमातील आमिरचा लूक त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा असणार आहे.  विचित्र हेअर स्टाईल, अतरंगी दाढी आणि रंगीबेरंगी आणि हटके कपडे या अवतारात शक्ती कुमार म्हणजेच आमिर खान पाहायला मिळणार आहे. अर्थात चित्रपटात त्याचा कॅमिओ आहे.   गायिका बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया एका मुलीची ही कथा आहे.

Web Title: Aamir Khan's 'Secret Superstar' and 'Stars Land Par' is a special connection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.