सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये जास्त स्ट्रगल करतोय आमिर खानचा भाचा इमरान खान, जाणून घ्या का ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 18:54 IST2021-03-20T18:33:50+5:302021-03-20T18:54:23+5:30
रिपोर्टनुसार, इमरान खान अभिनेत्री लेखाला काही काळासाठी डेट करतो आहे.

सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये जास्त स्ट्रगल करतोय आमिर खानचा भाचा इमरान खान, जाणून घ्या का ते
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पुतण्या इमरान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. त्याचा जन्म अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथे झाला. अमेरिकेत जन्मल्यामुळे तो अमेरिकन नागरिक आहे. २००८ साली 'जाने तू ... या जाने ना' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
यानंतर इमरान खानने 'आय हेट लव्ह स्टोरी', 'आफ्टर ब्रेक', 'देल्ली-बेली, 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'वन्स अपॉन टाइम मुंबई अगेन' अशा अनेक चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' या सिनेमात तो कंगना रनौत सोबत तो शेवटचा दिसला होता. आज इमरान बॉलिवूडच्या झगमगटापासून दूर आहे.
पत्नीबरोबर वादविवाद
इमरान खान बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण जेवढे स्ट्रगल करावे लागले तेवढेच स्ट्रगल त्याला त्याच्या पर्सनल लाईफमध्ये देखील करावं लागलं. इमरान खान आणि त्याच्या पत्नी अवंतिका गेल्या काही दिवसांपासून वेगळं राहतात. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, इमरान खान अभिनेत्री लेखाला काही काळासाठी डेट करतो आहे. लेखाचे पती पाब्लो चटर्जी आणि इमरान खान खूप चांगले मित्र होते. मात्र लेखा आणि इमरानच्या अफेअरबाबत कोणाला माहिती नाही. 'मटरू की बिजली का मन डोला'मध्ये तिने इमरानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. रिपोर्टनुसार, अवंतिका इमरानचे घर सोडले आणि इमरान खानने आपल्या मित्रांमध्ये लेखाची ओळखं करुन देण्याची सुरुवात केली होती. याचा परिणाम लेखाच्या लग्नावरही झाला आहे.
अमेरिकन नागरिकत्व वरून वाद
इमरान खानने अमेरिकतील सरकारकडे भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून अपील केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो केस लढत आहे, परंतु अमरेकिन सरकार त्यांची मागणी स्वीकारत नाही. अमरेकिचे सरकार इम्रान खानचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी कोट्यावधी रुपयाची मागणी करीत आहेत, तर इमरान खानने ही रक्कम देण्यास नकार दिला आहे.