Video: लेकीच्या साखरपुड्यातील आमीरचा 'डान्स' व्हायरल, नेटीझन्सला पडला एकच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 15:42 IST2022-11-19T15:41:42+5:302022-11-19T15:42:41+5:30

‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात आमिर खान एकदम हटके लुकमध्ये दिसला होता.

Aamir khan's dance at ayara khan engagement ceremoney went viral, netizens have only one question on his old look | Video: लेकीच्या साखरपुड्यातील आमीरचा 'डान्स' व्हायरल, नेटीझन्सला पडला एकच प्रश्न

Video: लेकीच्या साखरपुड्यातील आमीरचा 'डान्स' व्हायरल, नेटीझन्सला पडला एकच प्रश्न

बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे याच्यासोबत शुक्रवारी मुंबईत साखरपुडा पार पडला. नुपुर शिखारे हा आयराचा फिटनेस ट्रेनर असून नुपुरने अनेक बॉलिवुड सिनेमांमध्ये स्टंट केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये या कपलच्या रिलेशनशीपची चर्चा रंगली होती. नुकताच पैल पाहुणे आणि मित्रांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला. मुलीच्या साखरपुड्यात आमिर खानच्या लुकचीही जोरदार चर्चा रंगली. पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालुन आमिर खान कुल लुक मध्ये दिसून आला. तर, पापा कहते है बडा नाम करेगा... या गाण्यावर आमीरने डान्सही केला. आमीरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात आमिर खान एकदम हटके लुकमध्ये दिसला होता. या चित्रपटाकडून त्याला मोठ्या अपेक्षा होत्या. पण, चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी आमिर खान पब्लिकली दिसला आणि त्याला पाहून सगळेच थक्क झाले.
मिस्टर परफेक्शननिस्टची पांढरी दाढी अन् थकलेला चेहरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आईच्या अंत्ययात्रेत आमिर सहभागी झाला होता. तेव्हा त्याचा हा लूक पाहायला मिळाला. त्यानंतर, आता लेकीच्या साखरपुडा समारंभातही आमीर त्याच लुकमध्ये दिसल्याने नेटीझन्सने त्याला ट्रोलही केले आहे. 

व्हायरल बयानी या इंस्टा अकाऊंटवरुन आमीरचा साखरपुडा संभारंभातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, पापारैजी स्टेजवर आमीर डान्स करताना दिसून येतो. पांढरा कुर्ता, पायजमा आणि पांढरी दाढी असलेला आमीर पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. अनेकांना हा आमीर खानच आहे का, असा प्रश्नही पडला आहे. हा खरा आमीर, रियल... बाकी मेकअप अन् व्हीएफएक्सचा कमाल, असेही काहींनी सोशल मीडियावर लिहिले आहे. तर, एकाने लिहिले आहे की, आमीर खान अचाकन म्हातारा अन् एकदम तरुण होतो.

Web Title: Aamir khan's dance at ayara khan engagement ceremoney went viral, netizens have only one question on his old look