#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:34 AM2022-09-20T11:34:06+5:302022-09-20T11:35:01+5:30

आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैजल खान(Faisal Khan)ने नुकतेच बॉलिवूड कलाकारांची पोलखोल करत #BoycottBollywood ट्रेंडला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने असे बरेच खुलासे केले आहेत, जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

Aamir Khan's brother Faisal supports #BoycottBollywood trend, calls celebrities 'proud'! | #BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'!

#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'!

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैजल खान(Faisal Khan)नं त्याच्यासोबत मेला चित्रपटात काम केले आहे. याशिवाय फैजल आणखी दोन चित्रपटात झळकला आहे. मात्र त्यानंतर तो सिनेइंडस्ट्रीतून गायबच झाला. दरम्यान त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, आमिर आणि त्याच्या कुटुंबाने त्याला सिजोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी तो खूप चर्चेत आला होता. त्यानंतर आता तो पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याने #BoycottBollywood ट्रेंडला पाठिंबा दर्शवला आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधील बऱ्याच गोष्टींचा पर्दाफाश केला आहे.

फैजल खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो बॉलिवूड आणि सेलिब्रेटींवर निशाणा साधताना दिसत आहे. नुकतेच एका वेबपोर्टलशी बोलताना फैजल खान म्हणाला की, बॉलिवूडला पूर्णपणे मेकओव्हरची गरज आहे. पहिली बाब म्हणजे लेखन चांगले नाही आणि त्याहून कलाकारांची प्रतिमा चांगली नाही. बऱ्याच कलाकारांची नावं ड्रग्स प्रकरणात समोर आली आहेत. इतकेच नाही तर त्याने बॉलिवूडवर भ्रष्टाचार, गटशाही आणि घराणेशाहीवरही गंभीर आरोप केले आहेत.

#BoycottBollywood ट्रेंडला पाठिंबा
फैजल खान म्हणाला की, मी बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडला पूर्णपणे सपोर्ट करतो. कारण माझ्यासारखा प्रामाणिक व्यक्ती ज्याला प्रामाणिक काम करायचं आहे. तो यांच्यासारख्या लोकांमुळे कुठे जाईल. तुम्ही असा इंडस्ट्रीत आहात जिथे लोक पॉवर पोझिशनमध्ये आहेत आणि तुमच्यावर दबाव टाकत आहेत. जे तुम्हाला पुढे येऊ देत नाहीत.

सुशांत सिंग राजपूतचा खून केला...
तो पुढे म्हणाला की, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात जा, जर तुम्ही अडचणीतून मार्ग काढत चित्रपट बनवला तर तुम्हाला थिएटर देत नाहीत. कारण मोठ्या कलाकारांनाच थिएटर द्यायचं आहे. तर नवीन व्यक्ती कसा येईल? तुमची इच्छाच नाही की नव्या व्यक्तीची प्रगती व्हावी. जसे सुशांत सिंग राजपूत सारखे कलाकार यशाकडे वाटचाल करू लागला तर तुम्ही त्याचा मर्डर करता. 

बॉलिवूडकरांच्या पापांचा घडा भरलाय...
एक काळ असा येईल जेव्हा इंडस्ट्री पूर्णपणे संपुष्ठात येईल. कारण इंडस्ट्रीची अधोगती होताना दिसते आहे. त्यामुळे सर्व चित्रपट फ्लॉप होत आहेत. ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही. पुन्हा नवीन लोक येतील आणि इंडस्ट्रीची नव्याने पुन्हा सुरूवात होईल. सध्या बॉलिवूडवर बहिष्कार टाकला पाहिजे. यातूनच बॉलिवूडकरांना धडा मिळेल. कारण कलाकारांना खूप गर्व आला आहे. आता त्यांच्या पापांचा घडा भरला आहे. त्यामुळे त्याचे परिणाम इंडस्ट्रीला भोगावे लागणार आहेत. फैजल खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: Aamir Khan's brother Faisal supports #BoycottBollywood trend, calls celebrities 'proud'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.