‘बहिष्कृत’कंगना राणौतला आमिर खानचा ‘आधार! वाचा सविस्तर बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 15:00 IST2017-10-17T09:30:32+5:302017-10-17T15:00:32+5:30
कंगना राणौत हिला बॉलिवूडच्या ‘राजकारणात’ कुठलाही रस नाही. म्हणजे बॉलिवूडच्या ‘होयबा- नायबा’ अशांपैकी कंगना नाहीच. त्यामुळे आपल्या काही वर्षांच्या ...

‘बहिष्कृत’कंगना राणौतला आमिर खानचा ‘आधार! वाचा सविस्तर बातमी!!
क गना राणौत हिला बॉलिवूडच्या ‘राजकारणात’ कुठलाही रस नाही. म्हणजे बॉलिवूडच्या ‘होयबा- नायबा’ अशांपैकी कंगना नाहीच. त्यामुळे आपल्या काही वर्षांच्या करिअरमध्ये कंगनाने बॉलिवूडमध्ये अनेक बड्या बड्या लोकांशी पंगे घेतले. अनेकांना शत्रू निर्माण केलेत. हृतिक रोशन, राकेश रोशन, करण जोहर असे अनेकांच्या यादीत कंगना ‘शत्रू’ बनून राहिलीय. साहजिक बॉलिवूडमधील एक गट कायम कंगनाकडे दुर्लक्ष करतो, तिला टाळू पाहतो. अलीकडे हृतिक रोशनसोबतच्या वादानंतर तर या गटाने कंगनाला जणू अघोषितरित्या बहिष्कृत केले आहे. पण अशातही बॉलिवूडची एक व्यक्ती मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे म्हणायला हरकत नाही. होय, ही व्यक्ती कोण तर आमिर खान.
![]()
होय, बॉलिवूडच्या एका गटाने कंगनाला बहिष्कृत केले असले तरी आमिर मात्र कंगनाच्या पाठीशी उभा असल्याचे दिसतेय. अप्रत्यक्षपणे त्याने कंगनाला हा पाठींबा जाहिर केला आहे. होय, अलीकडे आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या आगामी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग झाले. मुकेश अंबानींच्या अँटेलियामध्ये हे स्पेशल स्क्रीनिंग पार पडले. अंबानींच्या घरी अनेक चित्रपटांचे स्पेशल स्क्रीनिंग होतात. काही निवडक सेलिब्रिटींना या स्क्रीनिंगचे निमंत्रण असते. काही दिवसांपूर्वीच अंबानींच्या घरी ‘सीक्रेट सुपरस्टार’चे स्क्रीनिंग झाले. आश्चर्य म्हणजे, या स्क्रीनिंगला बॉलिवूडच्या बड्या स्टार्सपैकी केवळ कंगना हजर होती.
![]()
करण जोहर आणि हृतिक रोशन दोघेही या स्क्रीनिंगला हजर नव्हते. आमिरची पत्नी किरण राव हिच्या व्यतिरिक्त केवळ कंगनाला या स्क्रीनिंगचे निमंत्रण दिले गेले होते. कदाचित कंगनाला बहिष्कृत करणे आमिरला योग्य वाटत नसावे. कदाचित म्हणूनच त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कंगना हजर होती.
ALSO READ: हृतिक रोशनमुळे आपल्या मॅनेजरवर बरसली कंगना राणौत! वाचा, सविस्तर बातमी!!
कंगना राणौतसोबत सुरु असलेल्या वादावर हृतिक रोशन आत्ताआत्तापर्यंत शांत होता. पण अलीकडे तो उघडपणे बोलला. अगदी नॅशनल टीव्हीवर बोलला. त्याआधी कंगनाने हृतिकसोबतच्या तिच्या कथित अफेअरवर नको ते खुलासे केले होते. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर घणाघाती आरोप केले होते. हृतिक सोबत माझे अफेअर होते, मी त्याच्याशी लग्न करायलाही तयार होते. हृतिकनेही पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर लग्नाची तयारी दर्शवली होती. पण नंतर तो पलटला आणि माझे पर्सनल मॅसेज व व्हिडिओ लीक करण्याची धमकी मला दिली, असे काय काय कंगना या शोमध्ये बोलली होती.