आमिर खान म्हणतो, नो ‘लो अँगल शॉट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 12:01 IST2017-04-17T06:31:01+5:302017-04-17T12:01:01+5:30
आमिर खान बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमधील आपल्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये आमिरने स्वत:चा एक वेगळा दबदबा निर्माण केला ...
.jpg)
आमिर खान म्हणतो, नो ‘लो अँगल शॉट!
आ िर खान बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमधील आपल्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये आमिरने स्वत:चा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. आमिर खान म्हणजे, सुपरहिट असे जणू समीकरण झाले आहे. ‘कयामत से कयामत तक’मधून बॉलिवूड डेब्यू करणारा आमिर खान आज बॉलिवूडच्या सगळ्यांत यशस्वी अभिनेत्यांमध्ये गणला जातो. आजही त्याचा हा प्रवास अविरत सुरु आहे. अलीकडे आलेल्या ‘दंगल’ या सिनेमानंतर तर बॉलिवूडच्या इतिहासात आमिर खानचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले आहे. एकंदर काय, तर आमिर खानवर लावलेला पैसा कधीच बुडत नाही. कारण आमिरवर लावलेला पैसा व्याजासकट वसूल होतो, हे पक्के आहे.
बॉलिवूडच्या या परफेक्शनिस्टने अनेक निर्माता-दिग्दर्शकांसोबत काम केलेत. पण हे सगळे काम आमिरने स्वत:च्या अटींवर केलेय. यापैकीच एक अट म्हणजे, नो ‘लो अँगल शॉट.’ होय, सगळ्या प्रकारचे शॉट देणाºया आमिरला कॅमेºयाचा हा शॉट अजिबात आवडत नाही. खरे तर बहुतांश चित्रपटांत हेच शॉट घेतले जातात. राम गोपाल वर्मा यांचा तर हा आवडता शॉट आहे. पण आमिरला हा शॉट जराही आवडत नाही. ‘लो अँगल शॉट’ म्हणजे, खालून शॉट घेत घेत, कॅमेºयास वरच्या दिशेने आणणे. आमिर आपल्या सगळ्या दिग्दर्शकांना हा शॉट न घेण्याची गळ घालतो. आमिरला सर्वाधिक ‘फुल लेंथ शॉट’वर विश्वास आहे. आता इतक्या बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष देणारा आमिर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट बनला असेल, तर त्यात नवल काय? होय ना?
ALSO READ : आमिर खानच्या दाढी लूकवर कोण आहे फिदा?
लवकरच आमिरचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा रिलीज होतो आहे.या चित्रपटात आमिर एक खास कॅमियो करणार आहे.