आमिर खानची अरिजीत सिंहसाठी पोस्ट, निवृत्तीच्या निर्णयानंतरही घेतलेली भेट; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:20 IST2026-02-09T16:19:41+5:302026-02-09T16:20:11+5:30

आमिर आणि अरिजीतच्या भेटीचं नक्की कारण काय होतं हे आता समोर आलं आहे.

aamir khan s post fir arijit singh thanks him for lending voice for his film ek din | आमिर खानची अरिजीत सिंहसाठी पोस्ट, निवृत्तीच्या निर्णयानंतरही घेतलेली भेट; कारण आलं समोर

आमिर खानची अरिजीत सिंहसाठी पोस्ट, निवृत्तीच्या निर्णयानंतरही घेतलेली भेट; कारण आलं समोर

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने काही दिवसांपूर्वीच पार्श्वगायनातून निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयाने सर्वांना विशेषत: चाहत्यांना धक्काच बसला. त्याच्या या निर्णयानंतर दोनच दिवसात अभिनेता आमिर खआन अरिजीतच्या पश्चिम बंगालमधील घरी पोहोचला होता. तिथे तो अरिजीत आणि कुटुंबासोबत ४ दिवस राहिला. अरिजीतच्या कुटुंबासोबत आमिरने मस्त वेळ घालवला. गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद लुटला तर कधी चेस खेळला. मात्र आमिर आणि अरिजीतच्या भेटीचं नक्की कारण काय होतं हे आता समोर आलं आहे.

आमिर खान प्रोडक्शन्सने इन्स्टाग्रामवर अरिजीतसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिले की, 'आमच्या एक दिन सिनेमासाठी आवाज दिल्याबद्दल अरिजीत तुझे खूप आभार. तुझ्यासोबत, तुझ्या कुटुंबासोबत आणि टीमसोबत घालवलेले चार दिवस खरोखर जादुई होते. खूप प्रेम.'


आमिर खानची निर्मिती असलेला 'एक दिन' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये त्याचाच मुलगा जुनैद खान असणार आहे. तर अभिनेत्री साउथ अभिनेत्रीसोबत त्याची जोडी जमली आहे. साई पल्लवीचा हा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे.  अरिजीतच्या काही शेवटच्या कमिटमेंट्सपैकी ही एक असणार आहे ज्यात तो पार्श्वगायन करणार आहे. 'एक दिन' सिनेमा १ मे रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title : अरिजीत सिंह की सेवानिवृत्ति के बाद आमिर खान ने उनसे मुलाकात की; कारण सामने आया।

Web Summary : अरिजीत सिंह की सेवानिवृत्ति की घोषणा के बाद, आमिर खान ने पश्चिम बंगाल में उनसे मुलाकात की। आमिर ने सिंह के परिवार के साथ चार दिन बिताए। यात्रा आमिर खान प्रोडक्शंस की फिल्म 'एक दिन' के लिए एक गाना रिकॉर्ड करने के लिए थी, जिसमें उनके बेटे जुनैद खान और साई पल्लवी हैं।

Web Title : Aamir Khan visits Arijit Singh after retirement; reason revealed.

Web Summary : After Arijit Singh's retirement announcement, Aamir Khan visited him in West Bengal. Aamir spent four days with Singh's family. The visit was to record a song for Aamir Khan Productions' film 'Ek Din,' starring his son Junaid Khan and Sai Pallavi.