"अजून पाहिला नाही, पण..." आमिर खानने 'धुरंधर: द रिव्हेंज' बद्दल केलं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:58 IST2026-03-27T09:56:48+5:302026-03-27T09:58:35+5:30
धुरंधर २: द रिव्हेंज'ने पहिल्या संपूर्ण आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम राखले.

"अजून पाहिला नाही, पण..." आमिर खानने 'धुरंधर: द रिव्हेंज' बद्दल केलं मोठं विधान
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असलेला 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने जागतिक स्तरावर १००० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक सेलिब्रिटीही कौतुक करत आहेत. सोशल मीडिया अक्षरश: 'धुरंधर'मय झालं आहे. कंगना रणौत, राम गोपाल वर्मा, अल्लू अर्जुन, रजनीकांत, अनुपम खेर आणि आलिया भट यांसारख्या स्टार्सनी चित्रपटाचं जोरदार कौतुक केलं आहे. आता यात आमिर खानच्या नावाचाही समावेश झाला आहे.
'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ दिल्ली'मध्ये सहभागी झालेल्या आमिर खानने 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशावर भाष्य केले. आमिर खान म्हणाला, "मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. पण चित्रपटाबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. 'धुरंधर'चा पहिला भाग आणि आता 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा".याचवेळी त्यांनी त्यांच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाबद्दलही भाष्य केलं. दिल्ली फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
#WATCH | Delhi | On 'Dhurandhar The Revenge' Movie, Actor Aamir Khan says, "...I've not seen the film yet, but I hear only praises of the film. Dhurandhar 1 and now Dhurandhar 2. Both the films have done exceptionally well, and my very best wishes to the team" pic.twitter.com/tfJupR8Gd3
— ANI (@ANI) March 26, 2026
'धुरंधर: द रिव्हेंज' हा २०२५ मध्ये आलेल्या 'धुरंधर'चा सिक्वेल आहे. चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, गौरव गेरा आणि राकेश बेदी यांसारखी स्टारकास्ट आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' (९१७ कोटी), श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' (८५७ कोटी), विकी कौशलच्या 'छावा' (८०७ कोटी) आणि ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १' (८५२ कोटी) आणि सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' (९१८.१८ कोटी) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या एकूण कमाईला अवघ्या एका आठवड्यात मागे टाकले आहे.