आमिर खानच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 06:00 IST2018-09-24T13:00:13+5:302018-09-25T06:00:00+5:30
आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देत असल्याने त्याचे मानधन देखील तगडे आहे. तो चित्रपटासाठी मानधन घेण्यासोबतच चित्रपटाच्या नफ्यातही काही वाटा घेतो.

आमिर खानच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
आमिर खानचा बॉलिवूडमध्ये एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. आमिर खानने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हम है राही प्यार के, दिल यांसारख्या खूपच चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले. लगान, दिल चाहता है, धुम 3, दंगल यांसारख्या त्याच्या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आज बॉलिवूडमधील सगळ्यात यशस्वी अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते.
आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. पण त्याने बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कधीही काम केलेले नाही. पण ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघे एकत्र येणार आहेत. हा चित्रपट 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देत असल्याने त्याचे मानधन देखील तगडे आहे. तो चित्रपटासाठी मानधन घेण्यासोबतच चित्रपटाच्या नफ्यातही काही वाटा घेतो. शाहरुख खान आणि सलमान खानच्या मानधनाच्या तुलनेत त्याचे मानधन कमी असले तरी त्याचे चित्रपट चांगलाच नफा करत असल्याने त्याला चांगलाच पैसा मिळतो. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वार्षिक उत्पन्न 143 कोटींच्या घरात आहे. त्याच्याकडे 1300 कोटीहून अधिक पैसा आहे.
आमिर खानचा मुंबईत 65 कोटींचा एक अलिशान फ्लॅट आहे. तसेच अमेरिकेतील बेवर्ली हिल्स या पॉश परिसरात 75-80 कोटींचा बंगला आहे. महाराष्ट्रातील पाचगणी या परिसरात देखील त्याचा एक भला मोठा बंगला आहे. आमिर खान हा मुळचा मुंबईचा असला तरी युपीतील शाहाबादसोबत त्याचे एक जवळचे नाते आहे. शाहाबादमधील अख्तियारपूर हे त्याचे गाव आहे. या गावात त्याची 125 एकर शेती असून या गावात आमिरची तब्बल 22 घरे आहेत.
आमिरकडे घरांप्रमाणे अनेक गाड्या देखील आहेत. त्याच्याकडे अनेक लग्जरी कार आहेत. त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात अनेक बुलेटप्रुफ गाड्या असून त्याची एक गाडी तर बुलेटप्रुफ असण्यासोबतच बॉम्बप्रूफ देखील आहे.