२३ वर्षांनी लहान जिनिलियासोबतच्या जोडीवर आमिरनं सोडलं मौन, देशमुखांच्या सूनेबद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:50 IST2025-06-09T11:45:59+5:302025-06-09T11:50:23+5:30

आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याची सहकलाकार जिनिलियाच्या कामाबद्दल कौतुक केलं.

Aamir Khan On Age Gap With Genelia Actor Aprriciated Her Performance Sitaare Zameen Par | २३ वर्षांनी लहान जिनिलियासोबतच्या जोडीवर आमिरनं सोडलं मौन, देशमुखांच्या सूनेबद्दल म्हणाला...

२३ वर्षांनी लहान जिनिलियासोबतच्या जोडीवर आमिरनं सोडलं मौन, देशमुखांच्या सूनेबद्दल म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आगामी 'सितारे जमीन पर'द्वारे (Sitaare Zameen Par ) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. सध्या आमिर खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाही. या चित्रपटात आमिर खानसोबत देशमुखांची सून अर्थात जिनिलिया डिसूझा (Genelia D'Souza) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'सितारे जमीन पर' २० जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याची सहकलाकार जिनिलियाच्या कामाबद्दल कौतुक केलं. तसेच दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरावरही भाष्य केलं.

आमिर खानने स्वतः २००८ मध्ये  'जाने तू... या जाने ना' या चित्रपटामध्ये जिनिलिया डिसूझाची पुतण्या इमरान खानसोबत जोडी बसवली होती. आता खुद्द आमिरचं 'सितारे जमीन पर' या चित्रपटात २३ वर्षांनी लहान असलेल्या जिनिलियासोबत काम करतोय. आमिर खान हा सध्या ६० वर्षांचा आहे. तर जिनिलिया ही ३७ वर्षांची आहे.  नुकतंच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जिनिलिया आणि त्याच्यातल्या २३ वर्षांच्या वयाच्या अंतराबद्दल आमिर खान म्हणाला,"मला माहित होते की माझ्या आणि जिनिलियाच्या वयाबद्दल नक्कीच प्रश्न उपस्थित होतील. बराच काळ लोटला आहे आणि आता इम्रान खानही माझ्यापेक्षा खूप मोठा झाला आहे. आता आपल्याकडे व्हीएफएक्स आहेत. पुर्वी असं होतं की जर मला १८ वर्षांच्या मुलाची भूमिका करायची असेल तर मला प्रोस्थेटिक्सचा वापर करावा लागायचा. जसं प्रोस्थेटिक्सचा वापर करुन अनिल कपूरनं 'ईश्वर' (१९८९) या चित्रपटात ८० वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. पण, आता व्हीएफएक्सच्या मदतीने तुम्ही पडद्यावर सहजपणे ८०, ४० किंवा २० वर्षांचे दिसू शकता. आता वय कलाकारांसाठी अडथळा नाही".

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला आहे. 'सितारे जमीन पर' हा २०१८ च्या स्पॅनिश चित्रपट 'चॅम्पियन्स' चा हिंदी रिमेक आहे. यापूर्वी आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसला होता, जो फ्लॉप ठरला होता. त्यामुळे 'सितारे जमीन पर' चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

'रिएल बॉलीवूड हंगामा'च्या मुलाखतीमध्ये आमिर खान जिनिलियाच्य कामाचं कौतुक केलं. तो म्हणाला, "तिने तिच्या पहिल्या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं होतं आणि मला असं वाटतं की, तिने सातत्याने चांगलं काम केलं आहे. तिचं प्रत्येक काम खूप खरं आणि प्रभावी वाटतं. मला तिच्याबरोबर काम करताना खूप मज्जा आली.  'सितारे जमीन परमध्ये आमची केमिस्ट्री खूप चांगली झाली आहे". आमिर खानच्या तोंडून कौतुक ऐकल्यानंतर जिनिलिया भारावली. "हे माझ्यासाठी खूप आहे, आज मला खूप गाढ झोप लागणार आहे", या शब्दात तिनं आनंद व्यक्त केला. 
 

Web Title: Aamir Khan On Age Gap With Genelia Actor Aprriciated Her Performance Sitaare Zameen Par