दादर स्टेशनबाहेर वडा पाव बनवताना दिसला आमिर खान, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:53 IST2025-06-09T15:38:29+5:302025-06-09T15:53:53+5:30
आमिर खानही मुंबईच्या वडापावचा चाहता!

दादर स्टेशनबाहेर वडा पाव बनवताना दिसला आमिर खान, व्हिडीओ व्हायरल
Aamir Khan Makes Vada Pav: गरमागरम वडापाव महाराष्ट्रीयन लोकांसाठी म्हणजे जीव की प्राण (Vada pav). विशेषतः मुंबईतला सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. तो बनवायला जितका सोपा आहे, तितकाच तो खायलाही चविष्ट आहे. वडापाव आपण कधीही खाऊ शकतो. पावसाळा असो हिवाळा असो की उन्हाळा लोकं मिटक्या मारत आनंदात वडापाव खातात. एक वडापाव खाल्ल्याने पोट टम्म भरतं. अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना वडापाव प्रचंड आवडतो. या यादीत विकी कौशल, अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, सचिन तेंडुलकर आणि आमिर खान (Aamir Khan) आहेत. नुकतंच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान दादर स्टेशनबाहेर वडा पाव बनवताना दिसलाय.
आपल्या साध्या स्वभावासाठी ओळखला जाणारा आमिर कोणत्याही ग्लॅमरशिवाय एका छोट्या वडापावच्या गाडीसमोर उभा राहून हा प्रसिद्ध स्ट्रीट फूड बनवताना दिसून आला. त्यानं स्वत:च्या हाताने पावाला चटणी लावली आणि तळलेला वडा त्या पावात ठेवला. ऐवढंच काय तर त्यानं मिर्चीसाठी विचारलं. यावेळी त्याच्या आजूबाजूला गर्दी जमली होती, पण आमिर अत्यंत शांत दिसून आला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून आमिर खानला वडापाव किती आवडतो हे स्पष्टपणे दिसून आलं.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर'द्वारे (Sitaare Zameen Par ) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. सध्या आमिर खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाही. या चित्रपटात आमिर खानसोबत जिनिलिया डिसूझा (Genelia D'Souza) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'सितारे जमीन पर' २० जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.