Aamir Khan-Kiran Rao Divorce: आमिर खान किरण रावच्या 'या' सवयीमुळे झाला होता त्रस्त, यामुळे दोघे झाले का विभक्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:12 IST2021-07-07T17:11:39+5:302021-07-07T17:12:03+5:30
आमिर खानने पत्नी किरण रावसोबत १५ वर्षांचा संसार संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Aamir Khan-Kiran Rao Divorce: आमिर खान किरण रावच्या 'या' सवयीमुळे झाला होता त्रस्त, यामुळे दोघे झाले का विभक्त?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानकिरण रावसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आला आहे. त्याने पत्नी किरण रावसोबत १५ वर्षांचा संसार संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. दोघांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे. यापूर्वीदेखील किरण आणि आमिरमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या गोष्टीला करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा दुजोरा मिळाला. यावेळी आमिरच्या सवयींबद्दल किरणने काही गोष्टींचा खुलासा केला होता.
करण जोहरच्या शोमध्ये किरण रावने आमिरच्या पहिल्या पत्नीचे नाव घेत म्हटले होते की, जेव्हा आमिरने रिना दत्ता यांना घटस्फोट दिला, तेव्हा मला आमिरसोबत संसार सुरु करणे हे एक आवाहन होते. आमिर सारख्या व्यक्तीसोबत राहणे कठीण होते, कारण तो खूप वेगळा व्यक्ती आहे. आमिरला पार्ट्यांचा शॉक नाही, त्याला गाणी ऐकण्याचीही आवड नाही. सर्वांना आमिर गंभीर स्वभावाचा व्यक्ती आहे. पण तो खूप मनमिळाऊ आहे.
तर आमिर खानने एका मुलाखतीत आपल्या खाजगी जीवनाबद्दल काही गोष्टीचा खुलासा केला होता. आमिर म्हणाला होता की, "किरणने मला रागात काही अशा गोष्टी बोलली होती, ज्यामुळे माझ्या वागण्यात बराच फरक पडला होता. तेव्हा किरण मला म्हणाली होती की, खऱ्या आयुष्यात मी कुणाचीच पर्वा करत नाही. मला असे वाटते तू माझ्यासाठी नाहीस. मी तुझ्या नियमांच्या चौकटीत बसतच नाही. तू जरी माझ्यासोबत असलाच तरी तुझे मन हे दुसरीकडेच नाही.
किरण राव आणि आमिर खानमध्ये असे काही मतभेद सुरु होते, पण अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.