आमिर खान पुन्हा एकदा जाणारेय 'लगान'मध्ये दाखवलेल्या गावी, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 18:13 IST2025-08-01T18:12:46+5:302025-08-01T18:13:09+5:30

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खान(Aamir Khan)चा चित्रपट 'लगान'(Lagaan Movie)चे चित्रीकरण गुजरातमधील कुनरिया गावात झाले होते. मिस्टर परफेक्शनिस्ट जवळजवळ २५ वर्षांनी या गावात परतत आहे.

Aamir Khan is once again going to the village shown in 'Lagaan', this is the reason behind it | आमिर खान पुन्हा एकदा जाणारेय 'लगान'मध्ये दाखवलेल्या गावी, हे आहे यामागचं कारण

आमिर खान पुन्हा एकदा जाणारेय 'लगान'मध्ये दाखवलेल्या गावी, हे आहे यामागचं कारण

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खान(Aamir Khan)चा चित्रपट 'लगान'(Lagaan Movie)चे चित्रीकरण गुजरातमधील कुनरिया गावात झाले होते. मिस्टर परफेक्शनिस्ट जवळजवळ २५ वर्षांनी या गावात परतत आहे. त्याचे कारणही खूप खास आहे. खरंतर, आमिर खान या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par) चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त तिथे जात आहे.

'सितारे जमीन पर' हा चित्रपट २० जून २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता तो त्याच्या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनासाठी कुनरिया गावात जात आहे. हे गाव गुजरातमधील भूजजवळ आहे. 'लगान' चित्रपटाचे चित्रीकरण याच गावात पूर्ण झाले. चित्रपटात ते चंपानेर म्हणून दाखवण्यात आले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'सितारे जमीन पर'च्या स्क्रीनिंगसाठी कुनरिया गावात जाणे हा आमिर खानसाठी जुन्या आठवणी ताजा करणारा अनुभव असेल. 

नवीन कलाकारांना दिली संधी
आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर' या चित्रपटात जिनिलिया देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सितारे जमीन पर या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खानने दहा नव्या उदयोन्मुख कलाकारांना चित्रपटात संधी दिली. आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांना घेऊन त्यांनी हा चित्रपट बनवला.

आमिर खानचा हा चित्रपट ऑनलाइन कुठे पाहायचा?
'सितारे जमीन पर' हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला आहे. आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही, परंतु तो थेट यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी आमिरच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल 'आमिर खान टॉकीज' वर प्रदर्शित झाला. इथे हा चित्रपट पे-पर-व्ह्यू मॉडेलनुसार प्रदर्शित करण्यात आला आहे. १०० रुपये देऊन हा चित्रपट पाहता येईल.
 

Web Title: Aamir Khan is once again going to the village shown in 'Lagaan', this is the reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.