आमिर खानच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा येणार सिक्वल? रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:49 IST2025-06-04T13:47:46+5:302025-06-04T13:49:44+5:30

२०१४ साली आमिर खानच्या गाजलेल्या पीके सिनेमाचा पुढचा भाग येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर (aamir khan)

Aamir Khan hit film PK movie sequel Ranbir Kapoor will be seen in the lead role | आमिर खानच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा येणार सिक्वल? रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत

आमिर खानच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा येणार सिक्वल? रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) सध्या त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २००७ मधील 'तारे जमीन पर'चा स्पिरीच्युअल सीक्वल समजला जातो. अशातच आमिर खान या चित्रपटाच्या निमित्ताने विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. यावेळी एके ठिकाणी संवाद साधताना आमिर खानने त्याच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आणणार, असे संकेत दिले आहेत.

आमिर खानच्या पीकेचा सिक्वल येणार

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' सिनेमाचा सिक्वल अर्थात 'पीके २' लवकरच भेटीला येईल, असं बोललं जातंय. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पीके' या चित्रपटाच्या अखेरीस रणबीर कपूरचा प्रवेश दाखवण्यात आला होता, ज्यामुळे सीक्वेलची शक्यता निर्माण झाली होती. आता, आमिर आणि रणबीर दोघेही या प्रकल्पासाठी उत्साहित असल्याचे समजते. परंतु चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. सध्या चित्रपटाच्या प्राथमिक स्क्रीप्टवर काम सुरु आहे.

याशिवाय 'सितारे जमीन पर'नंतर, आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची जोडी 'दादासाहेब फाळके' यांच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी एकत्र येणार आहे. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, फाळके यांच्या संघर्षमय प्रवासाचे चित्रण या चित्रपटात दिसेल. या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे 'लाल सिंग चढ्ढा'नंतर काही वर्षांचा ब्रेक घेऊन आमिर खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेला दिसतोय,

Web Title: Aamir Khan hit film PK movie sequel Ranbir Kapoor will be seen in the lead role