"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 08:55 IST2025-05-08T08:54:34+5:302025-05-08T08:55:03+5:30
'महाभारत माझा ड्रीम प्रोजेक्ट', आमिर म्हणाला...

"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' (Mahabharat) लवकरच सुरु होणार अशी चिन्ह आहेत. 'लाल सिंग चड्डा'च्या अपयशाने आमिरला प्रचंड धक्का बसला होता. आता तो 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना त्याने 'महाभारत' प्रोजेक्टचीही हिंट दिली आहे. शिवाय त्याला या सिनेमात कोणती भूमिका करायला आवडेल याचंही उत्तर दिलं आहे.
'एबीपी न्यूज'च्या कार्यक्रमात आमिर खान म्हणाला, 'महाभारत प्रोजेक्ट हे माझं स्वप्न आहे. मात्र हे फार कठीण आहे. महाभारत कधीच तुम्हाला पडू देत नाही पण आपल्याकडून प्रोजेक्ट पडू नये अशी मला भीती वाटते. म्हणूनच मी खूप लक्ष देऊन यावर काम करत आहे. माझा पुढचा सिनेमा रिलीज झाल्यावर मी महाभारत प्रोजेक्टवर काम करेन. मी यासाठी माझं बेस्ट देईन. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळे मी याविषयी अधिक बोलणार नाही."
आमिरने महाभारतातील भूमिकांबाबत असलेल्या भावनिक कनेक्शनबद्दलही सांगितले. तो म्हणाला, "मला श्रीकृष्णाची भूमिका करायला नक्कीच आवडेल. ही भूमिका मला आकर्षित करते. ही खूपच स्ट्राँग भूमिका आहे."
याआधी आमिरने सिनेमाच्या कास्टिंगवर भाष्य केलं होतं. भूमिका लक्षात घेऊनच याचं कास्टिंग केलं जाईल असं तो म्हणाला होता. सिनेमा २ पार्ट मध्ये बनेल आणि याला २ दिग्दर्शक असतील असंही त्याने सांगितलं होतं. सध्या आमिर आगामी 'सितारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे. २० जून रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.