शेजारी राहणा-या मुलीवर लट्टू झाला होता आमिर खान, रक्ताने लिहिले होते पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 13:31 IST2017-10-22T08:01:18+5:302017-10-22T13:31:18+5:30
आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ गत १९ आॅक्टोबरला रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान म्युझिशियनच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना चित्रपट चांगलाच ...
.jpg)
शेजारी राहणा-या मुलीवर लट्टू झाला होता आमिर खान, रक्ताने लिहिले होते पत्र!
आ िर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ गत १९ आॅक्टोबरला रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान म्युझिशियनच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना चित्रपट चांगलाच आवडला आहे. बॉक्सआॅफिसवरचे आकडे याचा पुरावा आहेत. दोन दिवसांत ‘सीक्रेट सुपरस्टार’ने १४ कोटी कमावले आहेत. ‘सीक्रेट सुपरस्टार’च्याच निमित्ताने आम्ही आमिर खानच्या आयुष्यातील एक रिअल किस्सा आपल्यासोबत शेअर करणार आहोत. होय, हा किस्सा आहे, आमिरच्या लव्ह स्टोरीचा.
![]()
सध्या आमिर पत्नी किरण रावसोबत आनंदी आयुष्य घालवतो आहे. पण तरूणपणी हाच आमिर आपल्या शेजारी राहणाºया मुलीसाठी वेडापिसा झाला होता. तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. इतका की, तिला इंप्रेस करण्यासाठी आमिरने तिला रक्ताने पत्रही लिहिले होते.
![]()
आमिरच्या शेजारी राहणारी ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नाही तर आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता होती. होय, दोघांचे लग्न २००२ मध्ये संपुष्टात आले असले, दोघांनीही घटस्फोट घेतला असला तरी रिना अद्यापही खान कुटुंबाचा एक भाग आहे. आमिर एकदा एका मुलाखतीत रिनाबद्दल बोलला होता. रिना माझ्या कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. ती कायम आमच्यासोबत असेल. कायदेशीररित्या आम्ही वेगळे झालो आहोत. पण आमचा बॉन्ड अद्यापही कायम आहे,असे आमिर म्हणाला होता.
![]()
आमिर व रिनाची लव्हस्टोरी कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. आमिर व रिना एकमेकांचे शेजारी होते. आमिर व रिना दोघेही चोरून लपून एकमेकांना बघायचे. एकमेकांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून खिडकीजवळ तासनतास घालवायचे. आमिरने एकदिवस हिंमत करून रिनाला प्रपोज केले. पण रिना घाबरलेली होती आणि त्यामुळे तिने आमिरला नकार दिला होता.
![]()
ALSO READ: OMG!! आंघोळ टाळण्यासाठी नवनवे बहाणे बनवतो आमिर खान, जिममध्ये देतो शिव्या!!
यानंतर आमिरने बरेच प्रयत्न केलेत. पण रिनाने प्रत्येकवेळी नकार दिला. अखेर आमिरची हिंमत तुटली. पण नेमक्या त्याचवेळी रिनानेही आमिरवरच्या प्रेमाची कबुली दिली. दोघांचेही रिलेशन सुरु झाले तेव्हा एकदिवस आमिरने रिनाला चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले होते. अर्थात यामुळे रिना जराही इम्प्रेस झाली नाही आणि तिने यापुढे तू असे काहीही करणार नाहीस, असे वचन आमिरकडून घेतले होते.