कॅमेरा बघताच लाजली आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी, पापाराझींना बघताच पाठ फिरवली अन्...; पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 16:34 IST2025-05-25T16:34:04+5:302025-05-25T16:34:28+5:30
आमिर खानच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्पॅट असं आहे. नुकतंच गौरीला स्पॉट करण्यात आलं. मात्र कॅमेरा आणि पापाराझींना पाहताच गौरीने काय केलं ते पाहाच.

कॅमेरा बघताच लाजली आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी, पापाराझींना बघताच पाठ फिरवली अन्...; पाहा व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. आमिर खानने काही दिवसांपूर्वीच त्याच्या वाढदिवशी रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत नव्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली होती. आमिर खानच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्पॅट असं आहे. नुकतंच गौरीला स्पॉट करण्यात आलं. मात्र कॅमेरा आणि पापाराझींना पाहताच गौरीने काय केलं ते पाहाच.
आमिरची गर्लफ्रेंड गौरीला वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने पँट आणि शर्ट असा कॅज्युअल लूक केला होता. कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत ती जात होती. तेवढ्यात ती पापाराझींच्या कॅमेऱ्याच स्पॉट झाली. सुरुवातीला हे गौरीच्या लक्षात आलं नाही. मात्र लक्षात येताच ती कॅमेऱ्याकडे बघून लाजली आणि पापाराझींना पाहताच ती पाठ फिरवून निघून गेल्याचं व्हिडिओत दिसत आहे. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी पेजवरुन गौरीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
कोण आहे आमिरची गर्लफ्रेंड गौरी स्पॅट?
आमिर खान आणि गौरी गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या दीड वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. गौरी स्प्रॅट बंगळुरुची रहिवासी आहे. सध्या ती आमिर खानच्या प्रोडक्शनमध्येच काम करते. गौरीने २००२ ते २००४ काळात लंडनच्या आर्ट्स युनिव्हर्सिटीमधून फॅशन, स्टायलिंग अँड फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. बी ब्लंट हेअरड्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ती पार्टनर आणि डायरेक्टर पदावर आहे. गौरी लाइमलाइटपासून दूर असल्याचं आणि तिला याची सवय नसल्याचं आमिरने सांगितलं होतं.