वजन वाढलं, पोट सुटलं! दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकसाठी आमिर करतोय तयारी? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 09:22 IST2025-09-09T09:21:39+5:302025-09-09T09:22:06+5:30
सध्या आमिरने वेगळ्याच कारणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आमिरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्टचं वजन प्रचंड वाढलेलं दिसत आहे. त्याचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

वजन वाढलं, पोट सुटलं! दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकसाठी आमिर करतोय तयारी? व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. कधी नवीन सिनेमामुळे तर कधी त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे आमिर चर्चेचा विषय बनतो. पण, सध्या आमिरने वेगळ्याच कारणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आमिरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्टचं वजन प्रचंड वाढलेलं दिसत आहे. त्याचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
एका X अकाऊंटवरुन आमिरचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आमिरने सितारे जमीन परच्या टीमसोबत रियुनियन केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत तो कलाकारांसह डान्स करताना दिसत आहे. पण, यामध्ये आमिरचा लूक पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. सितारे जमीन परमध्ये आमिरचं वजन एवढं वाढलेलं दिसत नव्हतं. पण, आता मात्र आमिरने नक्की कोणत्या प्रोजेक्टसाठी वजन वाढवलं आहे का? अशी चर्चा होत आहे.
Sooooooo cuteeeee Aamir ji sitaare zameen par only YouTube sitaare zameen par team enjoy 💖💖🕺💖💃😁#AamirKhan@AKPPL_Officialpic.twitter.com/8Dsir8zBr4
— Sudha Ajmera (@SudhaAjmera13) September 8, 2025
या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिरने वजन वाढवल्याचं म्हटलं जात आहे. आमिरच्या लूकची तुलना सितारे जमीन परमधल्या लूकशी चाहत्यांनी केली आहे. "दादासाहेब फाळके सिनेमासाठी आमिर वजन वाढवत आहे का? सितारे जमीन परमध्ये तर तो तरुण आणि फ्रेश दिसत होता", अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्याने "तो ६० वर्षांचा आहे. तो एक सिनियर सिटीजन आहे", असं म्हटलं आहे.
दरम्यान, आमिर आणि राजकुमार हिरानी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी एकत्र आले आहेत. आमिरच्या टीमकडूनही याची हिंट देण्यात आली होती. त्यामुळे आता आमिरला दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकमध्ये बघण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.