स्वत:च्याच लग्नात बनियनवर आलेल्या नुपूरला ट्रोल करणाऱ्यांना आयराने सुनावलं, म्हणाली, "तो घोड्यावर आला नाही, कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 10:46 IST2024-01-05T10:44:38+5:302024-01-05T10:46:23+5:30
Ira Khan Wedding : बनियन घालून आलेल्या नुपूरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मिसेस शिखरे, आयरा म्हणाली...

स्वत:च्याच लग्नात बनियनवर आलेल्या नुपूरला ट्रोल करणाऱ्यांना आयराने सुनावलं, म्हणाली, "तो घोड्यावर आला नाही, कारण..."
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कोर्ट मॅरेज पद्धतीने कायदेशीररित्या आयरा आणि नुपूरचा विवाहसोहळा ३ जानेवारीला संपन्न झाला. फिटनेस फ्रिक असलेला नुपूर स्वत:च्याच लग्नात घोड्यावर नाहीतर मित्रांसोबत मॅरेथॉन करत पोहोचला होता. लग्नासाठी बनियनवर आलेल्या नुपूरला पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. या ट्रोलर्सला आता मिसेस शिखरे झालेल्या आयराने खडे बोल सुनावले आहेत.
आयराने लग्नानंतर तिच्या इन्स्टाग्रामवरुन नवऱ्याबरोबरचा पहिला सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नुपूर बनियनवर दिसत आहे. त्याबरोबरच नुपूरचा धावतानाचा फोटोही आयराने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने नुपूरला ट्रोल करण्यांची शाळा घेतली आहे. "तो घोड्यावर आला नाही. तो धावत लग्नाच्या मांडवात पोहोचला. आणि रस्त्यांवर मी याचे क्यूट पोस्टर्स लावले आहेत," असं आयराने म्हटलं आहे.
आमिरचा जावई आणि आयराचा नवरा नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा तो फिटनेस ट्रेनर होता. आमिर खानचाही तो फिटनेस ट्रेनर राहिलेला आहे. काही वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.