आमिर खान आणि करीना कपूरचं 'फिर ना ऐसी रात...', 'लाल सिंग चड्ढा'मधील नवं गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:18 IST2022-06-25T15:17:35+5:302022-06-25T15:18:02+5:30

'थ्री इडियटस'नंतर आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

Aamir Khan and Kareena Kapoor new song 'Phir Na Aisi Raat ...' from 'Lal Singh Chadha' Movie | आमिर खान आणि करीना कपूरचं 'फिर ना ऐसी रात...', 'लाल सिंग चड्ढा'मधील नवं गाणं रिलीज

आमिर खान आणि करीना कपूरचं 'फिर ना ऐसी रात...', 'लाल सिंग चड्ढा'मधील नवं गाणं रिलीज

'थ्री इडियटस'नंतर आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे मोस्ट अवेटेड गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अरिजित सिंगनं गायले आहे. अलीकडेच आमिरनं सोशल मीडियावर करीनाचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी...' हे गाणं दशकातील सर्वोत्कृष्ट गाणं असल्याचं सांगत आहे. 

आमिर खाननं टी-सीरीजच्या सोशल मीडिया हँडलवर निर्मात्यांसह लाइव्ह जात हे गाणं लॉन्च केलं, यावेळी त्यानं प्रेम, वियोग आणि तळमळ या मानवी भावनांवरही चर्चा केली. यापूर्वी 'लाल सिंह चड्ढा'मधील 'कहानी...' आणि 'मैं की करां?...' हि गाणी रिलीज करण्यात आली असून, या गाण्यांना संगीत रसिकांचा चांगला रिस्पॉन्सही मिळाला आहे.


पुन्हा एकदा अरिजित सिंगचा सुरेल आवाज ऐकून चाहत्यांना त्यांचा उत्साह आवरता आला नाही. अनेक ट्विटर युजर्सनी या गाण्याबद्दल ट्विट केले आहे. काहींनी या गाण्याला उत्कृष्टही म्हटले आहे. युजरने ट्विट केले की, 'मास्टरपीस. अरिजित सिंगने ते खूप प्रेमाने गायले आहे. खूप गोड आवाज. दुसऱ्याने लिहिले की, 'या चित्रपटाचा म्युझिक अल्बम खूप चांगला आहे. ही गाणी लोकांच्या मनावर छाप सोडणार आहेत.

आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव आणि वायकॉम 18 स्टूडियो द्वारा निर्मित 'लाल सिंह चड्ढा'मध्ये करीना कपूर खान, मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Aamir Khan and Kareena Kapoor new song 'Phir Na Aisi Raat ...' from 'Lal Singh Chadha' Movie