आमिर-जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू; 'सितारे जमीन पर' सिनेमाने ३ दिवसांतच कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:04 IST2025-06-23T16:03:17+5:302025-06-23T16:04:08+5:30

'सितारे जमीन पर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आमिर खान आणि जिनिलिया देशमुखच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे.

aamir khan and genelia desmukh sitaare zameen par box office collection details | आमिर-जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू; 'सितारे जमीन पर' सिनेमाने ३ दिवसांतच कमावले 'इतके' कोटी

आमिर-जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू; 'सितारे जमीन पर' सिनेमाने ३ दिवसांतच कमावले 'इतके' कोटी

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला 'सितारे जमीन पर' सिनेमा २० जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. तारे जमीन पर सिनेमाचा सीक्वल असलेल्या 'सितारे जमीन पर'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'सितारे जमीन पर' प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. आमिर खान आणि जिनिलिया देशमुखच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. 

'सितारे जमीन पर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाने अवघ्या ३ दिवसांतच कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच 'सितारे जमीन पर' सिनेमाने १०.७ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर विकेंडला सिनेमाच्या कमाईत घसघशीत वाढ झाल्याचं दिसलं. शनिवारी सिनेमाने २०.२ कोटी तर रविवारी २७.२५ कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत 'सितारे जमीन पर' सिनेमाने ६०.२९ कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'सितारे जमीन पर' सिनेमा हा २००७ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या 'तारे जमीन पर' या लोकप्रिय सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमात आमिर आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमात आमिर खानसोबत १० नवोदित कलाकारांचा सहभाग आहे. या सिनेमातून दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल टीमची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या मुलांच्या बास्केटबॉल कोचची भूमिका आमिर खानने साकारली आहे. 

Web Title: aamir khan and genelia desmukh sitaare zameen par box office collection details