आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:16 IST2025-06-20T09:15:55+5:302025-06-20T09:16:25+5:30

'सितारे जमीन पर' सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंग शो पार पडला. यावेळी जिनिलीयासह रितेश देशमुखनेही हजेरी लावली होती. यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते रितेशचं कौतुक करत आहेत. 

aamir khan and genelia deshmukh pose for paparazi sitaare zameen par ritesh deshmukh video viral | आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...

आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या 'सितारे जमीन पर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात आमिरसोबत जिनिलीया देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. नुकताच 'सितारे जमीन पर' सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंग शो पार पडला. यावेळी जिनिलीयासह रितेश देशमुखनेही हजेरी लावली होती. यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते रितेशचं कौतुक करत आहेत. 

'सितारे जमीन पर'च्या स्क्रिनिंग दरम्यान आमिर आणि जिनिलीयाने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. तेव्हा रितेश त्यांच्या बाजूला उभा होता. आमिर खानने रितेशलाही फोटोसाठी बोलवलं. पण, रितेश गेला नाही. कारण,  'सितारे जमीन पर' सिनेमात आमिर आणि जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. बायकोच्या यशात सहभागी होणाऱ्या आणि तिला प्रोत्साहन देणाऱ्या रितेशचं चाहते कौतुक करत आहेत. 


दरम्यान, 'सितारे जमीन पर' सिनेमात आमिर खान आणि जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात आमिर खानसोबत १० नवोदित कलाकारांचा सहभाग आहे. प्रेरणादायी आणि भावनिक कथानक असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आज(२० जून) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Web Title: aamir khan and genelia deshmukh pose for paparazi sitaare zameen par ritesh deshmukh video viral