‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ मध्ये आमिर-क्रिती एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 11:46 IST2016-12-28T11:41:08+5:302016-12-28T11:46:21+5:30

‘हिरोपंती’ चित्रपटातून क्रिती सॅनन आणि टायगर श्रॉफ या दोन्ही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. दोघांनीही वेगवेगळ्या कलाकारांसोबत चित्रपट केले. क्रितीने ...

Aamir-Katithi together in 'Thugs of Hindustan'? | ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ मध्ये आमिर-क्रिती एकत्र?

‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ मध्ये आमिर-क्रिती एकत्र?

िरोपंती’ चित्रपटातून क्रिती सॅनन आणि टायगर श्रॉफ या दोन्ही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. दोघांनीही वेगवेगळ्या कलाकारांसोबत चित्रपट केले. क्रितीने ‘दिलवाले’ मध्ये शाहरूख खान, काजोल, वरूण धवन या बड्या कलाकारांसोबत काम केले. त्यानंतर तिला दर्जेदार चित्रपटांची लॉटरीच लागली.

नुकतीच तिला ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ मध्ये आमिर खानसोबत काम करण्याची आॅफर मिळालीय. अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचे नाव तर या चित्रपटासाठी निश्चित झाले आहेच. पण, ‘राब्ता’ आणि ‘बरेली की बर्फी’ मध्ये बिझी असलेल्या क्रितीला या चित्रपटासाठी तारखा देता येतात की नाही? यावर विचार सुरू आहे. क्रितीने अद्याप हा प्रोजेक्ट साईन केलेला नाही. पण, बिग बी आणि मि.परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी तिला पुन्हा मिळणार नाही. 

चित्रपटाचे कथानक हे स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ब्रिटिश इंडियाच्या ‘ठग्स’ या ग्रुपवर आधारित चित्रपट साकारला आहे. या चित्रपटाचे आणखी एक विशेष असे की, बिग बी आणि आमिर खान हे प्रथमच या चित्रपटामुळे आॅनस्क्रीन एकत्र पहावयास मिळणार आहेत. यशराज फिल्मस आणि आमिर खान हे देखील याच चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र आले आहेत. दिवाळी २०१८ ला चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याने थोड्याच दिवसात क्रितीला हा चित्रपट साईन करावा लागेल. 

Web Title: Aamir-Katithi together in 'Thugs of Hindustan'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.