​आमिरने केले खुलासा, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी नव्हर्स असतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 20:29 IST2016-12-21T20:29:01+5:302016-12-21T20:29:01+5:30

आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी आमिरने चांगलीच मेहनत घेतली आहे. ‘दंगल’ची उत्सुकता त्याच्या ...

Aamir has revealed, before the film's exposure, I am at number one | ​आमिरने केले खुलासा, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी नव्हर्स असतो

​आमिरने केले खुलासा, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी नव्हर्स असतो

िर खानचा बहुप्रतिक्षित ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी आमिरने चांगलीच मेहनत घेतली आहे. ‘दंगल’ची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली असतानाच आमिर खानने एक खुलासा केला आहे. मी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी नव्हर्स असतो असे तो म्हणाला. 

‘दंगल’ या चित्रपटात आमिरने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी खुद्द महावीर सिंग व त्यांच्या मुली गीता व बबिता उपस्थित होते. आमिर म्हणाला, माझ्या चित्रपटाचे प्रदर्शन होत असताना मी नेहमीच नव्हर्स असतो. माझ्यात आत्मविश्वास नसतो. आम्ही खूप काळजी घेत, त्यावर प्रेम करीत चित्रपटांची निर्मिती करीत असतो, मात्र यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी असेल याबद्दल नेहमीच चिंता वाटत असते. आतापर्यंत दंगल हा चित्रपट केवळ जवळचे मित्र, नातलग व महावीरजी यांनी पाहिला आहे. त्यांना माझा चित्रपट पसंत पडला याचा मला आनंद आहे. 


I am always nervous about my films: Aamir Khan

आमिर खानने दंगलच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी महावीर सिंग फोगट यांच्यासह सचिन तेंदुलकर, राज ठाकरेसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. २३ तारखेला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यावेळी प्रेक्षकांकडून कशी प्रतिक्रिया मिळेल हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. याची मला उत्सुकता लागली आहे असेही आमिर म्हणाला. 

दंगल या चित्रपटात आमिरने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारली असून त्याने यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मध्यमवयातील महावीर सिंग यांची भूमिका साकारण्यासाठी त्याने तब्बल ९३ किलो वजन वाढविले होते. दंगल या चित्रपटात आमिर खानसोबत साक्षी तन्वर, फातीमा सना शेख व सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Aamir has revealed, before the film's exposure, I am at number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.