आली लहर केला कहर..! KGF 2 साठी चाहते उत्सुक, स्वतःच बनवला ट्रेलर अन् केला रिलीज, SEE VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 17:27 IST2020-07-09T17:25:52+5:302020-07-09T17:27:08+5:30
'केजीएफ 2'च्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अखेर त्यांनी स्वतःच ट्रेलर बनविला आणि प्रदर्शित केला. पहा एकदा हा व्हिडिओ

आली लहर केला कहर..! KGF 2 साठी चाहते उत्सुक, स्वतःच बनवला ट्रेलर अन् केला रिलीज, SEE VIDEO
'केजीएफ: चॅप्टर 1'मध्ये सुपरस्टार यशच्या विस्मयकारक प्रदर्शनाने थक्क झाल्यानंतर त्याचे चाहते 'केजीएफ: चॅप्टर 2' मध्ये त्यांच्या लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘केजीएफ: चॅप्टर 2’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून त्याच्यासमोर अभिनेता संजय दत्त असणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून यशाच्या चाहत्यांनी स्वत:च केजीएफ: चैप्टर 2 चे फैन-निर्मित ट्रेलरचे विविध वर्जन यूट्यूबवर स्वत:च प्रदर्शित करून टाकले आहे. फॅन्सद्वारे बनवण्यात आलेल्या या ट्रेलरला देखील चाहत्यांची भरभरून पसंती मिळत असून त्या ट्रेलरवर चाहत्यांच्या मोठ्या संख्येने उड्या पडत आहेत.
सुपरस्टार यश आपला आगामी चित्रपट 'केजीएफ: चॅप्टर 2'साठी कठोर मेहनत करत आहे आणि तो निश्चितपणे आपल्या आगामी चित्रपटात आपला अद्भुत परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे. अभिनेता आपल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इतका गंभीर होता की त्याने दहा मिनिटांच्या दृश्यासाठी सहा महीने ट्रेनिंग घेतली होती.
सुपरस्टार यशच्या प्रभावशाली परफॉर्मन्समुळे, केजीएफ: चॅप्टर 1 ला हिंदी, तमिळ आणि कन्नड चैनलवर आपल्या सॅटेलाइट प्रीमियरद्वारे अधिकतम टीआरपी प्राप्त झाली. एवढेच नव्हे तर, ओटीटी प्लेटफॉर्मवर देखील केजीएफ: चॅप्टर 1ला चांगली दाद मिळाली ज्यामुळे चित्रपटाच्या पुढील भागासाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.
‘केजीएफ: चॅप्टर 2’ मध्ये यश मुख्य भूमिकेत असून त्याच्या समोर अभिनेता संजय दत्त असणार आहे. चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार असून तुम्हीदेखील सुपरस्टार यशच्या आणखी एक दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी तयार रहा.