एका व्हायरल व्हिडीओमुळे उद्धवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर; सध्या काय 'सिर्फ तुम'ची प्रिया गिल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 06:45 PM2024-02-19T18:45:00+5:302024-02-19T18:45:00+5:30

Priya Gill: रातोरात सुपरस्टार झालेल्या प्रियाने यशाच्या शिखरावर असताना अचानक करिअरला ब्रेक दिला.

a-wrong-news-report-ruined-her-career-the-Priya Gill-disappeared-overnight-where-is-she-today | एका व्हायरल व्हिडीओमुळे उद्धवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर; सध्या काय 'सिर्फ तुम'ची प्रिया गिल

एका व्हायरल व्हिडीओमुळे उद्धवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर; सध्या काय 'सिर्फ तुम'ची प्रिया गिल

संजय कपूर  (sanjay kapoor) याची मुख्य भूमिका असलेला सिर्फ तुम हा सिनेमा आठवतोय का? हळूवारपणे लव्हस्टोरी उलगडणारा हा सिनेमा त्याकाळी चांगलाच गाजला होता. या सिनेमात अभिनेत्री प्रिया गिल (Priya Gill) हिने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर प्रिया रातोरात सुपरस्टार झाली होती. तिचा चाहतावर्ग कमालीचा वाढला होता. मात्र, या सिनेमानंतर ती अचानकपणे कलाविश्वापासून दूर झाली. त्यामुळे ती सध्या काय करते हा प्रश्न अनेकांना पडतो.

जवळपास १७ वर्षांपासून प्रिया इंडस्ट्रीपासून आहे. २००६ मध्ये ती 'भैरवी' या सिनेमात अखेरची झळकली होती. त्यानंतर ती कुठेही दिसली नाही. रिपोर्टनुसार, प्रिया सध्या डेन्मार्कमध्ये स्थायिक असून तिचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिने अचानक सिनेसृष्टीला रामराम का केला हा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, इंडस्ट्री सोडण्यामागे एक खास कारण आहे.

'या' कारणामुळे प्रियाने सोडली इंडस्ट्री

रिपोर्टनुसार, एका फेक न्यूजमुळे प्रियाने इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला.  सोशल मीडियावर प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ती अन्नासाठी वणवण फिरत होती.इतकंच नाही तर गुरुद्वारामध्ये देण्यात येणारा प्रसाद खाऊन प्रिया तिचं पोट भरत होती असंही या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं होतं. हा व्हिडीओ फेक होता. मात्र, या अफवेचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यानंतर तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रियाने 'सिर्फ तुम' व्यतिरिक्त 'श्याम घनश्याम', 'बडे दिलवाले', 'जोश', 'रेड' यांसारख्या गाजलेल्या सिनेमात झळकली होती.
 

Web Title: a-wrong-news-report-ruined-her-career-the-Priya Gill-disappeared-overnight-where-is-she-today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.