साधासा मुलगा ते आताच हँण्डसम हंक; लोकप्रिय अभिनेत्याचा बालपणीचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 15:30 IST2023-12-13T15:21:13+5:302023-12-13T15:30:54+5:30

सध्या सोशल मीडियावर एक ड्रेंण्ड चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

A simple boy to a handsome hunk; Popular actor's childhood photo goes viral | साधासा मुलगा ते आताच हँण्डसम हंक; लोकप्रिय अभिनेत्याचा बालपणीचा फोटो व्हायरल

साधासा मुलगा ते आताच हँण्डसम हंक; लोकप्रिय अभिनेत्याचा बालपणीचा फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक ड्रेंण्ड चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेंण्डमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि चाहत्यांना या सेलिब्रिटींना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लहानपणी दिसणारा एक साधासा मुलगा ते आताच हँण्डसम हंक त्याचं हे जबरदस्त ट्रान्सफर्मेशन चर्चेत आहे.

हा फोटो पाहून अनेकांना या अभिनेत्याला ओळखणं कठिण झालं आहे तर अनेकांनी मात्र या अभिनेत्याला बरोबर ओळखलं आहे. आता तुम्हीही जर या अभिनेत्याला ओळखलं नसेलं तर अजून डोकं चालवण्याची काही गरज नाही. कारण आता आम्ही तुम्हला सांगणार आहोत की, हा अभिनेता नक्की आहे कोण. तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धार्थ मन्होत्रा आहेत. सिद्धार्थच्या लहानपणीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो नेटिझन्सना खूप आवडला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. 2012 साली त्याने सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर सिद्धार्थने ‘एक व्हिलन’, ‘हसी तो फसी’, ‘मरजावा’, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली. 2021साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला. शेरशाहनंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा ​'​योद्धा'मध्ये एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना दिसणार आहे. 

 


 

Web Title: A simple boy to a handsome hunk; Popular actor's childhood photo goes viral