हैदराबादमध्ये अक्षय कुमारने चालवली स्कूटी; प्रियदर्शनसोबत फिरताना दिसला खिलाडी; चाहते भलतेच खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 04:00 PM2023-10-17T16:00:05+5:302023-10-17T16:05:52+5:30

एका व्हायरल फोटोत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत अभिनेता अक्षय कुमार स्कुटर चालवताना दिसला.

A scooty driven by Akshay Kumar in Hyderabad; Khiladi seen walking with Priyadarshan | हैदराबादमध्ये अक्षय कुमारने चालवली स्कूटी; प्रियदर्शनसोबत फिरताना दिसला खिलाडी; चाहते भलतेच खूश

हैदराबादमध्ये अक्षय कुमारने चालवली स्कूटी; प्रियदर्शनसोबत फिरताना दिसला खिलाडी; चाहते भलतेच खूश

'सिंघम अगेन' या सिनेमाचे शूटिंग हैदराबाद या ठिकाणी पार पडलं. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात अक्षय सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी काही दिवसांपुर्वी अक्षय हैदराबादमध्ये पोहचला होता. या काळातलाच अक्षयचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत अक्षय स्कुटर चालवताना दिसला. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहते भलतेच खूश झाले आहेत.

व्हायरल फोटोमध्ये अक्षय गाडी चालवत असताना प्रियदर्शन मागे बसलेला दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अक्षय आणि प्रियदर्शनच्या कॉमेडी चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. लवकरच दोघं पुन्हा एकत्र काम करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. 

अक्षय आणि प्रियदर्शनने 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'हेरा फेरी' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. यानंतर दोघांनीही 'गरम मसाला', 'भागम भाग', 'भूल भुलैया' आणि 'दे दना दान' सारखे हिट कॉमेडी चित्रपट दिले. 2010 मध्ये रिलीज झालेल्या खट्टा-मीठा या चित्रपटात दोघांनी शेवटचं एकत्र काम केलं होतं.

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या 'मिशन राणीगंज' या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. 'मिशन रानीगंज' या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय कुमार , 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'वेलकम 3', 'हेरा फेरी 3', 'हाऊसफुल 5', 'सूराराई पोत्रू' , 'स्काय फोर्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारचा नुकताच 'OMG 2' चित्रपटात पाहायला मिळाला होता. 

Web Title: A scooty driven by Akshay Kumar in Hyderabad; Khiladi seen walking with Priyadarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.