"माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता...", 'त्या' विधानानंतर ए.आर.रहमान यांचा यूटर्न, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 14:19 IST2026-01-18T14:18:26+5:302026-01-18T14:19:54+5:30

"माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता...",'त्या' विधानानंतर ए.आर.रहमान यांचा यूटर्न, व्हिडीओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण 

a r rahman break silence on controversial statement about bollywood remark  | "माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता...", 'त्या' विधानानंतर ए.आर.रहमान यांचा यूटर्न, प्रकरण काय?

"माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता...", 'त्या' विधानानंतर ए.आर.रहमान यांचा यूटर्न, प्रकरण काय?

A R Rahman Video: संगीतातला देव अशी ओळख असलेले प्रसिद्ध संगीतकार म्हणजे ए आर रहमान. आपल्या अनोख्या संगीताने आणि गायनाने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलं.त्यांनी कंपोज केलेल्या गाण्यांची ख्याती जगभर आहे. 'जय हो','ताल','तु ही रे','कहना ही क्या' असे त्यांचे एकापेक्षा एक गाणी आणि अल्बम हिट आहेत. शांत स्वभावाचे ए आर रहमान यांचं कामच बोलून दाखवतं. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे ते प्रचंड चर्चेत आले आहेत.गेल्या ८ वर्षांत बॉलिवूडमध्ये आपल्याला कमी काम मिळत आहे धार्मिक किंवा जातीय' कारणं असू शकतात असा खळबळजनक दावा त्यांनी यावेळी केला होता. 


ए आर रहमान यांच्या या वक्तव्यावर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली होती. आता या प्रकरणी त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय,कोणालाही दुखावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. दरम्यान, या प्रकरणी मौन सोडत ते म्हणाले, "संगीत हे नेहमीच माझ्यासाठी आपल्या संस्कृतीशी जोडले जाण्याचं आणि तिच्याशी एकरूप होण्याचं माध्यम राहिलं आहे. भारत हे माझे घर, माझा गुरू आणि माझी प्रेरणा आहे."

मग पुढे त्यांनी म्हटलंय," मला असं वाटतं, कधीकधी तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतो.पण माझा हेतू नेहमीच सेवा करण्याचा राहिला आहे.माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.मला आशा आहे की माझा मुद्दा समजून घेतला जाईल.भारतीय असल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण , जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बहुसांस्कृतिक विचारांचा आदर केला जातो.

 नेमकं प्रकरण काय? 

'बीबीसी एशियन नेटवर्क'ला दिलेल्या मुलाखतीत  ए.आर. रहमान म्हणाले होते की, "कदाचित त्यावेळी देवाने या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या असाव्यात. तेव्हा मला असे काहीही जाणवले नाही. मात्र, गेल्या ८ वर्षांत जेव्हापासून सत्तेची समीकरणे बदलली आहेत, तेव्हापासून काही गोष्टी बदलल्या आहेत. जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांच्या हातात सत्ता आली आहे. मला थेट समोर कोणी काही बोलले नाही. पण मला असे ऐकायला मिळाले की माझ्या मागे धार्मिक कारणावरून राजकारण झालं." त्याचबरोबर त्यांनी छावा चित्रपटाबाबतही केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं.

Web Title : ए.आर. रहमान ने बॉलीवुड पर दिए बयान को स्पष्ट किया: 'किसी को ठेस पहुँचाने का इरादा नहीं था'.

Web Summary : ए.आर. रहमान ने बॉलीवुड पर अपनी टिप्पणी पर विवाद को संबोधित करते हुए कहा कि उनका इरादा किसी को ठेस पहुँचाना नहीं था। संगीत संस्कृतियों को एकजुट करता है, भारत उनकी प्रेरणा है। उन्होंने गलतफहमी को स्वीकार किया लेकिन सेवा पर जोर दिया और भारत की अभिव्यक्ति की स्वतंत्रता का सम्मान किया।

Web Title : A.R. Rahman clarifies Bollywood statement: 'Didn't intend to hurt anyone'.

Web Summary : A.R. Rahman addressed controversy over his Bollywood remarks, stating he didn't intend to offend. Music unites cultures, India is his inspiration. He acknowledged misunderstandings but emphasizes service and respects India's freedom of expression.