महिमा चौधरीवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं आईचं छत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:26 IST2023-04-17T13:25:52+5:302023-04-17T13:26:21+5:30
Mahima Chaudhary : कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईनंतर बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईनेही जगाचा निरोप घेतला आहे.

महिमा चौधरीवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं आईचं छत्र
मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईनंतर बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी(Mahima Chaudhary)च्या आईनेही जगाचा निरोप घेतला आहे. आईच्या निधनामुळे महिमा चौधरी कोलमडून गेली आहे. तीच नाही तर तिची मुलगी अरियानाचीही रडण्याने वाईट अवस्था झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिमाची आई बऱ्याच काळापासून वयाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होती. दरम्यान, अचानक महिमाच्या आईचा श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि तिने जगाचा निरोप घेतला. महिमा आणि तिची मुलगी एरियाना या दोघींनाही श्रीमती चौधरी यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. अशाप्रकारे या अभिनेत्रीच्या आयुष्यात नवीन वादळ आले आहे. यापूर्वी महिमाला कॅन्सर झाल्याचे समोर आले होते.
महिमा चौधरीला कर्करोग झाल्याचा खुलासा अनुपम खेर यांनी ९ जून २०२२ रोजी केला होता. 'सिग्नेचर' चित्रपटादरम्यान, महिमा चौधरीने अनुपम खेर यांच्यासोबत तिची वेदना शेअर केली आणि सांगितले होते की ती स्तनाच्या कर्करोगासारख्या समस्येने ग्रस्त आहे. तिच्यावर उपचार सुरू असल्याचेही अभिनेत्रीने सांगितले होते. दुसरीकडे, कॅन्सरसारख्या मोठ्या समस्येशी लढताना महिमाने दाखवलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे.