चोप्रा कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, 'बिग बॉस' फेम मन्नारा चोप्राच्या वडिलांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 09:10 IST2025-06-17T09:08:51+5:302025-06-17T09:10:00+5:30

Mannara Chopra Father Passed Away: बिग बॉस फेम मन्नारा चोप्रा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १६ जून रोजी मन्नाराचे वडील रमन राय हांडा यांचे निधन झाले. ते काही काळापासून खूप आजारी होते आणि काल त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

A mountain of grief has fallen on the Chopra family, 'Bigg Boss' fame Mannara Chopra's father passes away | चोप्रा कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, 'बिग बॉस' फेम मन्नारा चोप्राच्या वडिलांचं निधन

चोप्रा कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, 'बिग बॉस' फेम मन्नारा चोप्राच्या वडिलांचं निधन

बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) हिचे वडील रमन राय हांडा (Raman Rai Handa) यांचे १६ जून २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने चोप्रा कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मन्नारा चोप्राचे वडील रमन हांडा हे प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राचे काका होते. ते एक प्रसिद्ध वकील होते आणि दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमन हांडा काही काळापासून आजारी होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रमन राय हांडा यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी कामिनी चोप्रा आणि मुली मन्नारा आणि मिताली हांडा पूर्णपणे दुःखी झाल्या आहेत. संपूर्ण कुटुंबासाठी हा एक कठीण काळ आहे. ते कुटुंबातील सर्वांचे आधार होते आणि प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचे जाणे हे केवळ कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठीही मोठे नुकसान आहे.

१८ जून रोजी केले जाणार अंत्यसंस्कार 
रमन राय हांडा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार १८ जून २०२५ रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील अंबोली स्मशानभूमीत केले जातील. त्यांचे अंत्यसंस्कार दुपारी १ वाजता केले जातील. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. 

Web Title: A mountain of grief has fallen on the Chopra family, 'Bigg Boss' fame Mannara Chopra's father passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.