लाईव्ह कॉन्सर्टमध्येच चाहत्याने आतिफ अस्लमवर उधळले पैसे, गायकाच्या कृतीने जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 10:44 IST2023-10-27T10:41:19+5:302023-10-27T10:44:51+5:30

आतिफ अस्लमवर एका चाहत्याने लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यानच पैसे उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

A fan lavished money on singer Atif Aslam in a live concert the singer s act won hearts | लाईव्ह कॉन्सर्टमध्येच चाहत्याने आतिफ अस्लमवर उधळले पैसे, गायकाच्या कृतीने जिंकलं मन

लाईव्ह कॉन्सर्टमध्येच चाहत्याने आतिफ अस्लमवर उधळले पैसे, गायकाच्या कृतीने जिंकलं मन

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे (Atif Aslam) चाहते जगभरात आहेत. त्याच्या आवाजाला तोड नाही. आतिफ अस्लमच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी तर तुफान गर्दी होते. अशा कॉन्सर्ट्समध्ये काही लोक एन्जॉय करताना दिसतात तर काही मात्र अशांती पसरवतात. नुकतंच आतिफच्या एका कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने आतिफवर पैसे उधळले. यानंतर आतिफने दिलेली प्रतिक्रिया ऐकून लोक त्याचं कौतुक करत आहेत.

आतिफ अस्लमवर एका चाहत्याने लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यानच पैसे उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याच्या गाण्यावर सर्व चाहते नाचत मग्न असतानाच आतिफही सर्वांना हात दाखवत म्युझिक एन्जॉय करतोय. मात्र तेवढ्यात एक चाहता तिच्यावर पैसे उधळताना दिसतोय. यानंतर आतिफला आधी राग येतो. मात्र तो शांत होत माईकवरुन सांगतो,'मित्रा, हे पैसे माझ्यावर न उधळता दान कर. हा पैशांचा अनादर आहे.'

आतिफ अगदी शांततेत चाहत्याला मोठी गोष्ट समजावून सांगतो हे बघून सर्वच त्याचं कौतुक करत आहेत. आतिफचं गाणं आणि त्याचा स्वभाव चाहत्यांना खूपच भावतो.एका चाहत्याने व्हिडिओवर 'म्हणून तर तुम्ही मला खूप आवडता' अशी कमेंट केली आहे. दरम्यान यावेळी आतिफ लोकप्रिय गाणं 'सोचता हूँ वो कितने मासूम थे' गाताना दिसतोय. 

बॉलिवूडमध्येही आतिफ अस्लमची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. 'तेरा होने लगा हूँ','तू जाने ना','जीना जीना' सारख्या अनेक गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे

Web Title: A fan lavished money on singer Atif Aslam in a live concert the singer s act won hearts