'बॉर्डर २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, सिनेमात दिसणार सनी देओलचा हा आयकॉनिक सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:11 IST2025-05-29T09:11:01+5:302025-05-29T09:11:26+5:30
'बॉर्डर' (Border 2) या चित्रपटातून अभिनेता सनी देओल(Sunny Deol)ने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

'बॉर्डर २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, सिनेमात दिसणार सनी देओलचा हा आयकॉनिक सीन
'बॉर्डर' (Border 2) या चित्रपटातून अभिनेता सनी देओल(Sunny Deol)ने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता सनी देओल 'बॉर्डर २' (Border 2)मध्ये दिसणार आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आता 'बॉर्डर' मधील एक आयकॉनिक सीन बॉर्डर २ मध्येही पाहायला मिळणार आहे.
सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' चित्रपटात वरुण धवन आणि अहान शेट्टी देखील दिसणार आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की, चित्रपटाच्या या सीक्वलमध्ये जेपी दत्ता यांच्या १९९७ च्या 'बॉर्डर' चित्रपटातील एक शानदार रॉकेट लॉन्च सीनचा देखील समावेश करण्यात आला आहे. 'बॉर्डर' चित्रपटात सनी देओल पाकिस्तानशी लढतो तेव्हाचा हा सीन तुम्ही पाहिला असेल. या दरम्यान, तो खांद्यावर रॉकेट उचलून शत्रूंना जोरदार टक्कर देतो. बॉर्डर २ मध्येही असाच एक सीन पाहायला मिळणार आहे.
'बॉर्डर २'मध्ये हाय व्होल्टेज अॅक्शन सीन
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, सनी देओलच्या बॉर्डर २ मध्येही हाय व्होल्टेज अॅक्शन सीन असणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना रॉकेट लाँचचा एक जबरदस्त सीन पाहायला मिळेल. या सीनमध्ये सनी देओलचा दमदार अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की, सनी देओलने बॉर्डर २ चा सर्वात स्फोटक सीन खूप सुंदरपणे शूट केला आहे. त्याने जड रॉकेट आपल्या खांद्यावर उचलले आहे जणू काही ती एक क्षुल्लक गोष्ट आहे. या चित्रपटासाठी सनी देओलने आपले शंभर टक्के दिले आहेत.
या दिवशी भेटीला येणार 'बॉर्डर २'
अनुराग सिंग दिग्दर्शित बॉर्डर २ मध्ये सनी देओलचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. अॅक्शन आणि भावनांनी भरलेल्या या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. सनी देओल व्यतिरिक्त, वरुण धवन देखील चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सुनील शेट्टीचा मुलगा अहानदेखील एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २६ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.