एक सिनेमाही न करता अभिनेत्री नीलम कमावते कोट्यावधी रूपये, पण कुठून आणि कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:00 AM2022-03-04T08:00:00+5:302022-03-04T09:58:38+5:30

Neelam Kothari business : नीलम कोठारी नावाची एक हिरोईन बॉलिवूडमध्ये आली, प्रचंड गाजली आणि बघता बघता बॉलिवूडमधून गायब झाली. अर्थात तिचा थाट कमी झाला नाही...

90s Bollywood ACTRESS Neelam Kothari Now Ruling IN Jewellery Business | एक सिनेमाही न करता अभिनेत्री नीलम कमावते कोट्यावधी रूपये, पण कुठून आणि कसे?

एक सिनेमाही न करता अभिनेत्री नीलम कमावते कोट्यावधी रूपये, पण कुठून आणि कसे?

googlenewsNext

नीलम कोठारी (Neelam Kothari) नावाची एक हिरोईन बॉलिवूडमध्ये आली, प्रचंड गाजली आणि बघता बघता बॉलिवूडमधून जणू गायब झाली. होय,नीलमने चित्रपटांची दुनिया सोडल्याला आता दोन दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अर्थात तिचा थाट कमी झालेला नाही. चित्रपटांपासून दूर असूनही नीलम अलिशान आयुष्य जगते. महिन्याला कोट्यावधी रूपये कमावते.

1984 मध्ये ‘जवानी’या सिनेमाद्वारे नीलमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पुढे एकापेक्षा एक हिट चित्रपट आपल्या नावी केलेत. 2001 मध्ये प्रदर्शित ‘कसम’ या चित्रपटात नीलम शेवटची दिसली होती.  

बॉलिवूडमध्ये तिची आणि गोविंदाची जोडी तुफान गाजली. इतकी की, या जोडीला साईन करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू असायची. दोघांनीही एक-दोन नव्हे तर 14 सिनेमांत एकत्र काम केलं. पण करिअरच्या शिखरावर अचानक नीलमने बॉलिवूडला रामराम ठोकला. आता ती काय करते तर बिझनेस. होय, भलेही फिल्मी दुनियेतून ती गायब झाली असेल पण बिझनेसच्या दुनियेत मात्र ‘नीलम’सारखीच चमकत आहे. अगदी चित्रपटांतून कमावले नाहीत तितके पैसे बिझनेसमधून कमावते आहे. एका रिपोर्टनुसार, तिची नेटवर्थ 1 मिलियन डॉलरपेक्षाही जास्त आहे.

नीलम करते हा बिझनेस...
नीलम ही मुळातच एका हिरा व्यापाऱ्याची लेक. त्यामुळे चित्रपटात येण्यापूर्वीच ती हिऱ्याच्या दागिण्यांच्या व्यवसायात आली होती. नीलमच्या तीन पिढ्या  ज्वेलरी इंडस्ट्रीत होत्या. वडिल शिशीर कोठारी हेही या बिझनेसमधील मोठं नाव. त्यामुळे नीलमच्या कुटुंबाचा ज्वेलरी बिझनेस युरोप, अमेरिका, थायलंड, आशियात पसरला आहे. नीलमने मुंबईत ज्वेलरी डिझाईनिंगचा एक फॉर्मल कोर्स केला आणि यानंतर ती या बिझनेसमध्ये उतरली. आज नीलम या इंडस्ट्रीतील मोठ्ठ नाव बनलं आहे.

दोन अफेअर, दोन लग्न...
सिनेइंडस्ट्रीत असताना नीलमचं नाव गोविंदा आणि बॉबी देओलसोबत जोडलं गेलं. यामुळे तिच्या पर्सनल लाईफची बरीच चर्चा झाला. दोन अफेअरनंतर 2000 मध्ये नीलमने यूकेचा बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न केलं. पण काहीच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये टीव्ही अभिनेता समीर सोनी नीलमच्या आयुष्यात आला आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे जिचे नाव अहाना आहे. समीर व नीलम दोघांचंही हे दुसरं लग्न आहे.

Web Title: 90s Bollywood ACTRESS Neelam Kothari Now Ruling IN Jewellery Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.