‘83’मध्ये कपिल देव यांच्या मुलीनंही केलं काम, जाणून घ्या काय केलं अमिया देवने या सिनेमात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 01:13 PM2021-12-30T13:13:14+5:302021-12-30T13:24:40+5:30

Movie 83 : ‘83’मध्ये कपिल देव यांच्या लेकीचंही मोठं योगदान, कोण आहे अमिया देव?

83: Kapil Dev's Daughter Amiya Worked As An Assistant Director | ‘83’मध्ये कपिल देव यांच्या मुलीनंही केलं काम, जाणून घ्या काय केलं अमिया देवने या सिनेमात?

‘83’मध्ये कपिल देव यांच्या मुलीनंही केलं काम, जाणून घ्या काय केलं अमिया देवने या सिनेमात?

googlenewsNext

कबीर खान (Kabir Khan) दिग्दर्शित ‘83’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात कपिल देव (Kapil Dev) यांच्या भूमिकेत रणवीर सिंगने (Ranveer Singh) अक्षरश: जीव ओतलाय. त्याच्या मेकअपपासून तर क्रिकेटच्या पिचवर फटकेबाजी करण्यापर्यंतसगळंच अगदी हुबेहुब कपिल देव सारखं आहे आणि यासाठी रणवीरचं भरभरून कौतुक होतंय. रणवीरने पडद्यावर आपलं बेस्ट दिलं. पण पडद्यामागेही एका व्यक्तिनं या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली. विशेष म्हणजे, या व्यक्तिचं कपिल देव यांच्याशी खास नातं आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून कपिल देव यांची लाडकी लेक अमिया देव (Amiya Dev) आहे.

अमियाने ‘83’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. 2019 मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून ती ‘83’च्या टीम कबीरमध्ये सामील झाली होती. अलीकडे एका मुलाखतीत दिग्दर्शक कबीर खान यांनी अमियाचं प्रचंड कौतुक केलं होतं. ‘83’मध्ये अमिया असल्यामुळे आम्हा सर्वांना फार मदत झाली. कपिल देव आणि त्यांनी लेक दोघांनीही या चित्रपटात मोलाचं योगदान दिलं. ती माझी अस्टिस्टंट होती. पण कपिल यांच्याकडून आम्हाला काहीही करवून घ्यायचं म्हटलं की आम्ही अमियाच्या माध्यमातून ती गोष्ट करवून घ्यायचो. अमियाला कपिल देव कधीच नाही म्हणत नाहीत. ‘83’मध्ये कपिल देव यांचा कॅमिओ रोल आहे. कपिल देव आधी या रोलसाठी तयार नव्हते. अमियानेच आपल्या पापाला राजी केलं. शिवाय कॅमेऱ्यापुढे त्यांना अ‍ॅक्टिंग करतानाही मदत केली. ‘83’ शूट करताना अनेकदा काही गोष्टी आम्हाला कन्फ्युज करायच्या. अशावेळी अमिया थेट पापाला फोन करून आमच्या शंका दूर करायची, असं कबीर खान यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.

अमिया ही कपिल व रोमी भाटिया यांची एकुलती एक लेक आहे. कपिल व रोमी यांच्या लग्नाच्या 14 वर्षानंतर अमियाचा जन्म झाला होता. अमियाने युकेमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सेंट एंड्रयूजमधून शिक्षण पूर्ण केलं. सोशल मीडियावर ती सक्रीय नाही. तिचं इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊंट प्रायव्हेट आहे.

Web Title: 83: Kapil Dev's Daughter Amiya Worked As An Assistant Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.