आता हेच पाहणे बाकी होते, ८ महिन्याची गरोदर करिना कपूर झाली ट्रोल,चाहते उडवतायेत तिची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 16:24 IST2021-01-27T16:19:01+5:302021-01-27T16:24:48+5:30
करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते. योगा करतानाचा तिचे काही फोटो आणि व्हिडीओही तिने शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.

आता हेच पाहणे बाकी होते, ८ महिन्याची गरोदर करिना कपूर झाली ट्रोल,चाहते उडवतायेत तिची खिल्ली
गुड न्यूज शेअर केल्यापासून करिना कपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कधी प्रेग्नंसीदरम्यान काम करताना दिसते तर कधी घराबाहेर वॉक करताना दिसते. काही ना काही एक्टीव्हीटी करण्यात बेबो सध्या स्वतःला बिझी ठेवत आहे. फ्रेबुवारीमध्ये करिना दुस-या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे करिना आणि सैफ बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
दरम्यान करीना कपूर योगा करत स्वतःला फिट ठेवण्याचाही प्रयत्न करत आहे. इतकंच नव्हे तर खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगते. भारतीय जेवणच करणे ती पसंत करते. करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते. योगा करतानाचा तिचे काही फोटो आणि व्हिडीओही तिने शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.
यामध्ये लिहिले की, थोडा सा योग..थोडीसी शांती. प्रेग्नेंसी दरम्यान करीना स्वतःला फिट आणि ग्लॅमरस ठेवते. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत येत असते. करीनाच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती तर मिळते मात्र काहींना तिचा हा अंदाज फारसा रुचलेला दिसत नाही. काही युजर्सनी तर तिच्या या फोटोंची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.
बेबी बंम्प फ्लॉन्ट करत योगा करतानाचे करिनाचे फोटो पाहून अनेकजण चित्र विचित्र कमेंट करत तिची थट्टा करत आहेत. एकाने तर म्हटले की, ''प्रेग्नंट तर नाही, पण माझाही लूक करिनासारखाच येतो'', तर एकाने म्हटले आहे की, ''कलयुग आहे हेच पाहणे बाकी होते''.
धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणे गरजेचे आहे. अगदी तैमूरच्या जन्माआधीच या दोघांनी एक मोठा निर्णय घेतला होता.तैमूरची काळजी घेण्यासाठी या दोघांनी एक नियम केला आणि त्याचं ते तंतोतंत पालन करत असून या नव्या नियमामुळे तैमूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असल्या तरी त्याचं बालपण जपणं ही माझी आणि सैफची पालक म्हणून जबाबदारी आहे असं बॉलीवूडची बेगम अभिनेत्री करीना कपूर खान हिने म्हटलं होतं.