7391_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:01 IST2016-06-11T09:31:34+5:302016-06-11T15:01:34+5:30
पहिला पाऊस, पहिली सर, पहिली ओढ भरभरुन आनंद देणारा असतो. मान्सूनचे आगमन होताच हे सारं काही आठवतं. अंगावरील सरीचा जोर मनातील भावना भिजवतात. अलगद आपल्या ओठावर आपली आवडती गाणी येतात. बॉलीवूड देखील या भावना जाणून घेण्यात मागे राहिले नाही. अशी कित्येक गाणी आहेत, जी आपल्याला धुंद करतात, पावसात नेतात आणि जणू आपल्या अंगावर पावसाच्या सरी पडल्यासारखं वाटते.

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्यावर ‘बाघी २’ या चित्रपटात छम छम बरसे हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात दोघे पावसात चिंब भिजताना दाखविण्यात आले आहेत.
दे दना दन या चित्रपटात अक्षय कुमार आणि कटरिना कैफ यांच्यावर पावसाचे गीत चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात कटरिना खूपच सेक्सी वाटते.
सरफरोश चित्रपटात आमीर खान आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणेही खूप गाजले.
मोहरा चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं पावसातील सर्वोत्तम गाण्यापैकी एक आहे. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे.
शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर दिल तो पागल है या चित्रपटात पावसातील गाणं चित्रीत करण्यात आले आहे. उदीत नारायण आणि लता मंगेशकर यांचे गाणे खूप गाजले.
आमीर खान आणि काजोल यांच्यावर ‘फना’ या चित्रपटात हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे.
नमक हलाल या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर पावसात हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
गुरु चित्रपटात ऐश्वर्या रॉयने पावसातील बरसो या गाण्यावर छान नृत्य केले आहे. गुलजार यांचे गीत आणि ए. आर. रहमान यांच्या संगीतामुळे या गाण्याला वेगळाच बाज आहे.
मि. इंडिया चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्यावर हे छानसं गाणं चित्रीत झाले आहे.