४८ वर्षीय साहिल खानने दुसऱ्यांदा केलं लग्न, २२ वर्षीय मिलेनासोबत दुबईत केला निकाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:28 IST2025-02-19T18:27:34+5:302025-02-19T18:28:10+5:30
Sahil Khan : 'स्टाईल' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता साहिल खानने त्याची २६ वर्षे लहान गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्रासोबत ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले होते आणि आता त्यांनी निकाह केला आहे.

४८ वर्षीय साहिल खानने दुसऱ्यांदा केलं लग्न, २२ वर्षीय मिलेनासोबत दुबईत केला निकाह
'स्टाईल' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता साहिल खान(Sahil Khan)ने त्याची २६ वर्षे लहान गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्रासोबत ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार काही दिवसापूर्वी लग्न केले होते आणि त्यानंतर आता त्याने निकाह केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या वधूचा चेहरा दाखवताना दिसतो आहे. याआधी, १५ फेब्रुवारीला त्याने व्हिडिओ आणि फोटो शेअर करून बुर्ज खलिफामध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्याचे सांगितले होते. जिथे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
आता साहिल खानने १८ फेब्रुवारीला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी मिलेनाने पांढऱ्या रंगाचा अबाया घातला आहे आणि अभिनेता फुलांनी झाकलेला चेहरा दाखवताना दिसत आहे. तर, अभिनेता देखील पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसतो आहे. पठाणी अवतारात त्याला ओळखतादेखील येत नाही आहे. त्याच्या लूकचे चाहतेही कौतुक करत आहेत.
साहिलने दोन पद्धतीत केलं लग्न
साहिलने दोन रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. कारण अभिनेता मुस्लिम आहे आणि त्याची पत्नी ख्रिश्चन आहे. त्यामुळे आधी त्यांनी दुबईतील बुर्ज खलिफा येथे ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले आणि नंतर इस्लाम धर्मानुसार लग्न केले. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अल्लाह लग्नाला आशीर्वाद देवो.' आमीन.'
साहिल खानची पहिली पत्नी कोण आहे?
अभिनेत्याचे हे दुसरे लग्न आहे. याआधी त्याने इराणमध्ये जन्मलेली अभिनेत्री नेगर खानसोबत लग्न केले होते. पण २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर, मिलेना ही युरोपमधील बेलारूसची रहिवासी आहे. दोघांनी रशियात एंगेजमेंट केली होती.