4 वर्षांपासून काम नाही, तरी या अमिषा पटेलला आहेत महागडे शौक ! वापरते 50 हजाराची बॅग आणि एन्जॉय करते पार्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 11:55 IST2017-09-29T06:25:38+5:302017-09-29T11:55:38+5:30

अभिनेत्री अमिषा पटेल ब-याच दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात नाही. अमिषाचा कोणताही सिनेमा रसिकांच्या भेटीला आलेला नाही. नुकतंच अमिषाचं मुंबई विमानतळावर ...

For 4 years, it does not work, though Ameesha Patel has an expensive hobby! Uses 50 thousand bags and parties to enjoy | 4 वर्षांपासून काम नाही, तरी या अमिषा पटेलला आहेत महागडे शौक ! वापरते 50 हजाराची बॅग आणि एन्जॉय करते पार्ट्या

4 वर्षांपासून काम नाही, तरी या अमिषा पटेलला आहेत महागडे शौक ! वापरते 50 हजाराची बॅग आणि एन्जॉय करते पार्ट्या

िनेत्री अमिषा पटेल ब-याच दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात नाही. अमिषाचा कोणताही सिनेमा रसिकांच्या भेटीला आलेला नाही. नुकतंच अमिषाचं मुंबई विमानतळावर दर्शन झालं. काळ्या रंगाचा गॉगल आणि पांढ-या रंगाचा ट्रॅक सूटमध्ये ती पाहायला मिळाली. मात्र यावेळी लक्ष वेधून घेत होती ती अमिषाकडे असलेली तिची बॅग. अमिषा सध्या कोणत्याही सिनेमात काम करत नसली तरी तिचे थाट गर्भश्रीमंतांसारखेच आहेत. अमिषाकडे 'वर्सेक चाओज' या महागड्या ब्रँडची बँग आहे. या बॅगची किंमत किती असेल याची कुणी कल्पनाच करु शकत नाही. अमिषाकडे असलेल्या या बॅगची किंमत 775 डॉलर म्हणजे जवळपास 50 हजार 713 रुपये इतकी आहे. अमिषाकडे सध्या काम नसलं तरी तिच्याकडे असणा-या सगळ्या गोष्टी आणि तिचे सगळे शौक महागडे आहेत. 2013 साली रुपेरी पडद्यावर आलेल्या शॉर्टकट रोमिओ सिनेमात अमिषाचं रसिकांना अखेरचं दर्शन झालं होतं. 2000 साली अभिनेता हृतिक रोशनसह कहो ना प्यार है या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी अमिषा आता बहुतांशी बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्येच पाहायला मिळते. पार्ट्यां करणं हासुद्धा अमिषाचा एक महागडा शौक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मध्यंतरी कोणतंही आमंत्रण नसताना अमिषा कपूर कुटुंबीयांच्या पार्टीत पोहचली होती. तिने अभिनेता रणबीर कपूरसह जवळीक वाढवण्याचाही प्रयत्न केला. पहिल्या सिनेमातूनच लोकप्रिय झालेल्या अमिषाकडे सध्या मात्र कोणताही सिनेमा नाही. ती तिच्या खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. अमिषाचं नाव दिग्दर्शक विक्रम भटशी जोडलं गेलं. 2002 मध्ये आप मुझे अच्छे लगने लगे या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी विक्रम आणि अमिषाची भेट झाली. यानंतर दोघांच्या अफेअरच्या खुमासदार चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्या. दोघंही लग्न करणार असल्याचंही बोललं गेलं. मात्र 5 वर्षातच त्यांच्यातलं नातं तुटलं. 'कहो ना प्यार है' या चित्रपटाने हृतिक रोशनसारखा सुपरस्टार बॉलिवूडला मिळवून दिला. हा चित्रपट, चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांचीच चर्चा त्यावेळी झाली होती. या चित्रपटातील गाणी तर प्रचंड गाजली होती. तसेच अमिषा पटेल आणि हृतिक रोशन यांच्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना भावली होती. 

Also Read:अमिषा पटेल अशी पडली मागे की, रणबीर कपूरने काढला पार्टीमधून पळ!

Web Title: For 4 years, it does not work, though Ameesha Patel has an expensive hobby! Uses 50 thousand bags and parties to enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.