बॉलिवूड कलाकारांच्या प्रपोजची इंटरेस्टींग गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 15:24 IST2018-07-19T15:23:32+5:302018-07-19T15:24:42+5:30

बॉलिवूड कलाकारांनी रिअल लाइफमध्ये त्यांच्या पार्टनरला कशाप्रकारे आणि कुठे प्रपोज केलं हे फार कमी लोकांना माहीत आहे.

4 Bollywood Celebrity Couples Who Have Very Interesting Proposal Stories! | बॉलिवूड कलाकारांच्या प्रपोजची इंटरेस्टींग गोष्ट!

बॉलिवूड कलाकारांच्या प्रपोजची इंटरेस्टींग गोष्ट!

एखादा मुलगा मुलीला कसा वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करतो हे तुम्ही वेगवेगळ्या सिनेमांमध्ये पाहिलं असेलच. पण या बॉलिवूड कलाकारांनी रिअल लाइफमध्ये त्यांच्या पार्टनरला कशाप्रकारे आणि कुठे प्रपोज केलं हे फार कमी लोकांना माहीत आहे. चला जाणून घेऊ बॉलिवूडच्या या कलाकारांनी कसे केले प्रपोज....

१) करण सिंह ग्रोवर - बिपाशा बसु

'अलोन'या सिनेमावेळी करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसु यांची ओळख झाली होती. आता त्यांच्या लग्नाला २ वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. दोघांच्या लग्नाची खूप चर्चाही झाली होती. पण दोघांपैकी प्रपोज कुणी केलं होतं हे फारचं कमी लोकांना माहीत आहे. दोघेही कोह समुईमध्ये एकत्र होते. ती रात्र ३१ डिसेंबरची होती. करणसोबत रिंग घेऊन आला आणि त्याने अचानक बिपाशाला रिंग दिली. त्यावेळी ती चांगलीच घाबरली होती. या प्रपोजने तिला चांगलाच धक्का बसला होता पण तिने लग्नाला होकार दिला. 

२) शाहरूख खान - गौरी खान

शाहरूख खान आणि गौरी खान एकत्र येऊन आता २७ वर्षांपेक्षा काळ झाला आहे. दिल्लीत सुरु झालेली त्यांची लव्हस्टोरी मुंबईपर्यंत आलीये. मुश्ताक शेख यांनी लिहिलेल्या आपल्या बायोग्राफीमध्ये शाहरूखने सांगितले की, 'एके दिवशी मी गौरीला तिच्या घरी सोडायला गेलो होतो. जेव्हा ती गाडीतून उतरत होती तेव्हा तो गौरीला म्हणाला की, मी तुझ्याशी लग्न करेन. इतकेच नाही तर गौरीचं उत्तर ऐकण्यापूर्वीच शाहरूख तिथून निघून गेला होता.

३) अभिषेक बच्चन - ऐश्वर्या राय बच्चन

एका मुलाखतीत अभिषेकने सांगितलं की, ऐशला प्रपोज करण्याच्या काही वर्षआधी मी न्यूयॉर्कमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होतो. रात्री असंच हॉटेलच्या बाल्कनीमध्ये उभा असताना असाच मनात विचार आला की, 'किती चांगलं होईल जर ऐशसोबत माझं लग्न होईल'. काही वर्षांनी टोरंटोमध्ये 'गुरु' सिनेमाच्या प्रिमिअरसाठी संपूर्ण कास्ट न्यूयॉर्कला पोहोचली होती. त्यावेळी अभिषेक ऐश्वर्याला त्याच हॉटेलमधील बाल्कनीत घेऊन गेला आणि त्याने ऐश्वर्याला प्रपोज केलं. 

४) सैफ अली खान - करिना कपूर

सैफ अली खान आणि करिना कपूर यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहीत आहे. सैफने कसं प्रपोज केलं हे करिनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिने सांगितलं की, 'आम्ही भेटल्यानंतर काही महिन्यांनीच सैफने मला पॅरीसमध्ये प्रपोज केलं. त्यावेळी आम्ही एका हॉटेलमध्ये होतो. तेव्हा मी सैफला नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने प्रपोज केलं. यावेळी आम्ही एका चर्चमध्ये होतो. मी माझ्या करीअरच्या महत्वाच्या टप्प्यवर होते म्हणून मी त्याला विचार करायला वेळ मागितला. आणि दोन दिवसांनी मी त्याला होकार दिला'.

Web Title: 4 Bollywood Celebrity Couples Who Have Very Interesting Proposal Stories!