'त्रिदेव' सिनेमाला ३४ वर्षे पूर्ण, अभिनेत्री सोनम खाननं दिला आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 20:24 IST2023-07-07T20:24:06+5:302023-07-07T20:24:58+5:30
Tridev : त्रिदेव चित्रपटात नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, सनी देओल, माधुरी दीक्षित आणि सोनम हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाला रिलीज होऊन नुकतेच ३४ वर्षे पूर्ण झाले आहेत.

'त्रिदेव' सिनेमाला ३४ वर्षे पूर्ण, अभिनेत्री सोनम खाननं दिला आठवणींना उजाळा
१९८९ चा ब्लॉकबस्टर चित्रपट त्रिदेव जो अफलातून गाण्यांसाठी सुपरहिट ठरला. नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, सनी देओल, माधुरी दीक्षित आणि सोनम सारख्या दिग्गज कलाकारांच्या अनोख्या अभिनयासाठी हा चित्रपट ओळखला जातो. त्रिदेव चित्रपटाने आज ३४ वर्ष पूर्ण केली असून अभिनेत्री सोनमने यात निर्णायक भूमिका साकारली ती म्हणजे रेणुका! आजपर्यंत चित्रपटातील “ओये ओये” आणि “तिरची टोपीवाले” या प्रतिष्ठित गाण्यांमधील तिच्या नृत्याविष्कारासाठी ती कायम लोकांच्या स्मरणात राहिली आहे. त्रिदेवचे सोनमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे.
त्रिदेव रिलीज झाल्यापासून ३४ वर्षे पूर्ण झाल्यावर अभिनेत्री सोनमने या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीत गेम-चेंजर कसा ठरला याबद्दल सांगितले. ती म्हणते की, त्रिदेव अनेक प्रकारे गेम चेंजर होता. त्रिदेवसाठी माझी पहिली पसंती नव्हती. मला शेवटच्या क्षणी या चित्रपटात घेण्यात आले. मला जी भूमिका करायची होती ती शेवटच्या क्षणी मिळाली आणि ती मी केली. त्रिदेव हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट होता. त्यामुळे बरीच ओळख निर्माण झाली आणि मला नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करायला मिळाले.
सोनम लवकरच ओटीटीमध्ये करणार पदार्पण
राजीव राय दिग्दर्शित हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर होता. सोनम, नसुरुद्दिन शाह, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित आणि सनी देओल व्यतिरिक्त या चित्रपटात संगीता बिजलानी, अनुपम खेर आणि अमरीश पुरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. आता बराच काळ सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर सोनम लवकरच ओटीटीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.