३१ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने १४ वर्षांच्या मुुलीच्या भूमिकेसाठी केले स्वत:चे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 18:14 IST2017-03-05T12:42:57+5:302017-03-05T18:14:30+5:30

एखादी भूमिका साकारण्यासाठी कलाकार स्वत:वर काय प्रयोग करतील हे सांगणे मुश्किलच. आता हेच बघा ना बहुचर्चित ‘जग्गा जासूस’मध्ये ३१ ...

The 31-year-old actress has made herself known for her 14-year-old role | ३१ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने १४ वर्षांच्या मुुलीच्या भूमिकेसाठी केले स्वत:चे हाल

३१ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने १४ वर्षांच्या मुुलीच्या भूमिकेसाठी केले स्वत:चे हाल

ादी भूमिका साकारण्यासाठी कलाकार स्वत:वर काय प्रयोग करतील हे सांगणे मुश्किलच. आता हेच बघा ना बहुचर्चित ‘जग्गा जासूस’मध्ये ३१ वर्षांच्या सयानी गुप्ता हिने १४ वर्षांच्या मुलीची भूमिका साकारण्यासाठी स्वत:च्या शरीरावर असे काही प्रयोग केले की, त्यातून बाहेर पडण्यासाठी ती अजूनही धडपड करीत आहे.
 


अनुराग बासू यांच्या ‘जग्गा जासूस’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. सिनेमात रणबीर कपूर, कॅटरिना कैफ आणि सयानी गुप्ता यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, हा सिनेमा म्यूट कॉमेडी आहे. ‘बर्फी’नंतर अनुराग ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने पुन्हा म्यूट कॉमेडी घेऊन येत आहेत. याविषयी नुकतेच सयानी गुप्ता हिने माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, बॉलिवूडमध्ये रातोरात स्टार बनण्याच्या फॉर्म्युल्यावर मी अजिबात विश्वास ठेवत नाही. कारण मी बॉलिवूडमध्ये अधिक काळ स्थिर होण्यासाठी आणि चांगल्या भूमिका करण्यासाठी आली आहे. 



सयानीने ‘जग्गा जासूस’मधील तिच्या भूमिकेविषयी सांगताना म्हटले की, माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका म्हणून मी याकडे बघते. मी अनुराग बासू यांचा खूप सन्मान करते की, त्यांनी माझी या भूमिकेसाठी निवड केली. त्यांची कास्टिंग प्रोसेस खरोखरच उत्तम आहे. त्यामुळे मी त्यांना बॉलिवूडचे जीनियस म्हणून बघते. जेव्हा लोक मला स्क्रीनवर बघतील तेव्हा त्यांचा विश्वास पटणार नाही की, मी खरोखरच १४ वर्षांची असल्याचे दिसते. 



यावेळी सयानीने तिच्या आॅडिशनविषयीही काही गोष्टी शेअर केल्या. ती म्हणाली की, मी आॅडिशनसाठी डोक्याचे केस कापले होते. माझ्या या डेडिकेशनला बघून दादा खूप खूश झाले होते. कारण भूमिका मिळण्याअगोदरच असे धाडस सहसा कोणी करत नसल्याचेही तिने सांगितले. या सिनेमात सयानी रणबीर कपूरच्या १४ वर्षांच्या मैत्रिणीची भूमिका साकारणार आहे. रणबीरदेखील सिनेमात शाळेत जाणाºया मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: The 31-year-old actress has made herself known for her 14-year-old role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.