'गणपत' चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्स; अ‍ॅक्शन सीनसाठी टायगर आणि कृतीने घेतली मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:00 AM2023-10-18T11:00:51+5:302023-10-18T11:03:17+5:30

'गणपत: अ हिरो इज बॉर्न' हा चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्सचा वापर करण्यात आला आहे.

3000 VFX Shots in Tiger Shroff and Kriti Starrer Ganapath | 'गणपत' चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्स; अ‍ॅक्शन सीनसाठी टायगर आणि कृतीने घेतली मेहनत

'गणपत' चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्स; अ‍ॅक्शन सीनसाठी टायगर आणि कृतीने घेतली मेहनत

अभिनेता टायगर श्रॉफचा 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन आणि अमिताभ बच्चन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  या चित्रपटात लव्ह स्टोरी, अॅक्शन आणि ड्रामा या सगळ्याचा तडका आहे. शिवाय, वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.

नुकतेच एका मुलाखतीमध्ये निर्माता जॅकी भगनानी चित्रपटासाठी टायगर आणि  कृती सेनन घेतलेल्या मेहनतीवर भाष्य केलं. तो म्हणाला, 'अॅक्शन जॉनरच्या चित्रपटात घाम गाळण्याशिवाय पर्याय नसतो. या चित्रपटासाठी क्रितीने खूप मेहनत घेतली. वर्षभर चाकू कसे वापरायचे याचे तिने प्रशिक्षण घेतले. टायगर निःसंशयपणे देशातील सर्वात मोठा अ‍ॅक्शन स्टार आहे'.


पुढे तो म्हणाला, 'चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्स आहेत. तर उर्वरित शूटिंगसाठी सुमारे 100 दिवस लागले. तसेच प्रत्येकाचा चित्रपट पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. हा चित्रपट भविष्यावर बेतलेला आहे. जर हा चित्रपट लोकांना आवडला तर याचा दुसरा पार्टही बनवण्यासाठी  प्रोत्साहन मिळेल'. 

गणपत हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट  हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.  हिरोपंती या चित्रपटानंतर टायगर आणि कृतीची जोडी गणपत या चित्रपटात पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर आणि कृती यांचा हिरोपंती हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला होता. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी गणपत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Web Title: 3000 VFX Shots in Tiger Shroff and Kriti Starrer Ganapath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.